मुंबई : भारताता सर्वात जास्त वापरलं जाणारं आणि लोकप्रिय अन्न म्हणजे तांदूळ. तांदळापासून बनवलेला भात किंवा इतर आणखी पदार्थ भारतात खूप प्रसिद्घ आहे. भात देखील वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, जसे बिर्याणी, पुलाव, मसाला, टोमॅटो राईस, गोड भात इत्यादी. प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी तांदूळ बनवला जातो. तेच कोकणात किंवा भारताच्या दक्षिणात्य भागात तांदळाचे पदार्थ खाले जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की चूकीच्या पद्धतीने तांदूळ शिजवल्यास कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांदूळ बनवण्याचा योग्य मार्ग सुमारे 4 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून उघड झाला. यामध्ये तांदूळ योग्य प्रकारे बनवून कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कसा कमी होतो हे संशोधनात सांगितले आहे.


तांदूळ बनवण्याचा योग्य मार्ग कोणता?


चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये, इंग्लंडमधील Queens University Belfastच्या संशोधकांनी तांदूळ बनवण्याच्या योग्य पद्धतीबद्दल सांगितले होते. त्यांच्या मते, तांदूळ बनवण्यापूर्वी तांदूळ रात्रभर किंवा किमान 3-4 तास पाण्यात भिजवून ठेवावा. यानंतरच तांदूळ शिजवा. यामुळे, कर्करोग आणि हृदयरोगास कारणीभूत असलेले तांदळातील विष 80 टक्क्यांपर्यंत कमी होते.


कर्करोग आणि हृदयरोगास कारणीभूत घटक भातामध्ये कसे येतात?


संशोधकांच्या मते, जमिनीत इंडस्ट्रियल टॉक्सिन्स आणि कीटकनाशकांची उपस्थिती तांदळाला दूषित करते. ज्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. या घटकांमुळे तांदळामध्ये आर्सेनिक नावाच्या विषाचा अतिरेक होतो, ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका होऊ शकतो.


तांदूळ बनवण्याच्या या 3 पद्धतींवर प्रयोग करण्यात आला


एएनआयने 2017 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, विद्यापीठ संशोधकांनी तांदूळ बनवण्याच्या तीन पद्धतींचा अभ्यास केला, त्यापैकी रात्रभर किंवा 3-4 तास पाण्यात भिजवलेले तांदूळ बनवण्याची पद्धत सर्वात फायदेशीर असल्याचे दिसून आले. संशोधकांनी पहिल्या पद्धतीमध्ये दोन तृतीयांश पाण्यात एक भाग तांदूळ शिजवला.


दुसऱ्या पद्धतीमध्ये पाण्याचे पाच भाग आणि तांदळाचा एक भाग शिजवला गेला आणि तांदूळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी काढून टाकण्यात आले. या दुसऱ्या भागात हानिकारक आर्सेनिकचे प्रमाण जवळजवळ निम्म्यावर आले.


त्याच वेळी, तिसऱ्या भागात, तांदूळ रात्रभर भिजत होता. ज्यात हानिकारक घटक 80 टक्क्यांनी कमी झाले.