सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल तपासता, तर सावधान...!
अनेकांना सकाळी उठल्याउठल्या मोबाईल तपासण्याची सवय असते.
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : मोबाईलनं माणसाचं अवघं विश्व व्यापून टाकलं आहे. दिवसरात्र माणूस मोबाईलच्याच आसपास घुटमळत असतो. अनेकांना तर सकाळी उठल्याउठल्या मोबाईल तपासण्याची सवय असते. तुम्हाला जर ही सवय असेल तर तातडीनं सोडून द्या. सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल पाहणाऱ्यांना अनेक त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल पाहिल्याने मेंदूवर ताण पडतो. रक्तदाबही वाढण्याची शक्यता असते. आदल्या दिवशी घडलेल्या घटनांची उजळणी होत असल्यानं तणावही वाढतो. दिवसाची सुरुवात तणावानं होते. माणसाची कार्यक्षमताही कमी होते.
मोबाईल गरजेचा आहे. पण तुमच्या जिवाएवढं मोल मोबाईलला देऊ नका. मोबाईलचा अतिरेक टाळा. नाहीतर जिवघेणे आजार तुमचा घास घ्यायला कधीही तयारच आहेत.