Salt Intake : भारतीय जेवण हे मीठा ( Salt ) शिवाय पूर्ण होतंच नाही. आपल्या जेवणाच्या प्रत्येक पदार्थामध्ये मीठ ( Salt ) हे गरजेचं मानलं गेलंय. इतकंच नव्हे तर काही पदार्थ मीठाशिवाय बेचव लागतात. मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात केल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो. मात्र मीठा ( Salt Intake ) चा अतिवापर तुम्हाला तुम्हाला आजारी पाडू शकतो. जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय मिठाच्या अतिसेवनामुळे ( Salt Intake ) किडनीच्या कार्यावर देखील परिणाम होताना दिसतो. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन ( Kidney stone ) आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मीठाचं सेवन योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. अशातच काही लोकं डाएटचा ( Diet ) भाग म्हणून मीठाचं प्रमाण कमी करतात किंवा पूर्णतः बंद करतात.


आज आपण जाणून घेऊया की, दररोज तुम्ही मीठाचं सेवन करत असाल आणि ते अचानक बंद केलं तर त्याचा कसा परिणाम होतो. मीठ खाणं ( Salt Intake ) सोडून दिल्यानंतर तुमच्या शरीरात कशा पद्धतीने बदल होतात हे पाहुयात. 


तब्बल एक महिना मीठ खाल्लं नाही तर...


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही सलग एक आठवडा मीठ खाणं बंद केलंत तर तुमच्या शरीरात विविध बदल दिसून येतात. हे बदल कोणते आहेत ते पाहा-


  • सुरुवातीच्या काळात शरीरात सोडियमचं सेवन कमी झाल्याने बॉटर रिटेंशनमध्ये कमतरता जाणवते. यावेळी तुमच्या ब्लड प्रेशरचा स्तरही खालावू शकतो. 

  • शरीरात मीठाचं प्रमाण कमी झालं की, इलेक्ट्रोलाईटचं असंतुलन होऊ शकतो. ज्यामुळे स्नायूंच्या कार्यामध्ये अडथळा, मज्जातंतूंचे संक्रमण, मळमळ होण्याची शक्यता असते

  • याशिवाय मीठाचं सेवन बंद केल्यानंतर तुम्हाला उल्टी होणं, चक्कर येण्याची समस्या जाणवू शकते.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे व्यक्ती कोमात देखील जाऊ शकते. एका सामान्य व्यक्तीला दररोज 5 ग्रॅम म्हणजेच 1 चमचे मीठ आवश्यक असतं. जर व्यक्तीला किडनी, लिव्हर किंवा डायलेटेड कार्डिओमायोपॅथी सारख्या समस्या नसतील तर आहारात मीठाचे सेवन कमी करू नये.