मुंबई : अनेक जणांना मासे खायला आवडतात. तर काही लोकं अशीही असतात ज्यांना मासे आवडत नाही. मासे न खाणाऱ्या व्यक्तींसाठी ही बातमी आहे. तुम्हाला माहिती आहे का, मासे न खाणं हे सिगारेट पिण्यापेक्षाही अधिक धोकादायक आहे. आहारात ओमेगा 3ची कमी असेल तर व्यक्तीचं आय़ुष्य कमी होतं असं नुकतंच एका अभ्यासातून समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या एका अभ्यासात असा दावा केला आहे की, आहारातील ओमेगा 3ची कमी व्यक्तीचं आयुष्य कमी करते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या आहारात नियमितपणे ओमेगा-3 चा समावेश असावा. मासा हा ओमेगा-3 चा चांगला स्त्रोत मानला जातो.


या अभ्यासात संशोधकांना असं दिसून आलं की, सिगारेट फुकल्याने व्यक्तीचं आयुष्य चार वर्षांपर्यंत कमी होतं. तर दुसरीकडे सालमोन आणि मॅकेरेल या माशांमध्ये असलेलं ओमेगा 3 फॅटी एसिडच्या कमीमुळे व्यक्तीचं आयुष्य 5 वर्षांपर्यंत कमी होऊ शकतं. 


हा अभ्यास अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात फर्मिंघम हार्ट स्टडीच्या आकड्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 


फॅटी एसिड रिसर्च इंस्टिट्यूटचे प्रोफेसर आणि या अभ्यासाचे सह-लेखक डॉ. बिल हॅरिस यांच्या म्हणण्याप्रमाणे, ओमेगा-3 हा एक जोखीम घटक म्हणून दर्शवितो आणि इतर जोखमीच्या घटकांइतकेच महत्त्वपूर्ण मानला जावा.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आहार, तंबाखूचे व्यसन, मद्यपान आणि शारीरिक हालचालींमधील बदलांसह आयुर्मान कमी करणारे धोके कमी केले जाऊ शकतात. यामुळे केवळ लोकांचे ढासळणारे आरोग्य सुधारणार नाही तर अकाली मृत्यूचा धोकाही कमी होईल. 


2,500 लोकांवर 2018 मध्ये अभ्यासात, संशोधकांना असं आढळलं की, ज्या लोकांनी ओमेगा-3 चं जास्त प्रमाणात सेवन केलं त्यांना लवकर मृत्यूचा धोका 33 टक्के कमी होता. महिलांवर आधारित अभ्यासात देखील असेच परिणाम दिसून आले आहेत.