`हे` पदार्थ खात असाल तर वाढतो कॅन्सरचा धोका, वेळीच सावध व्हा!
Symptoms of Cancer: आजच्या युगात कॅन्सर हा आजार अतिशय सामान्य झाला आहे. दिवसेंदिवस कॅन्सर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशावेळी तुम्ही वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
Cancer Symptoms and causes News in Marathi : आपण रोजच्या जीवनात काय खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. असाच एक आजार म्हणजे कॅन्सर. आज संपूर्ण जगात कॅन्सर हे मृत्यूचे सर्वा मोठे कारण आहे. कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये आपली जीवनशैलीच कारणीभूत ठरते असं एका अभ्यासातून निर्दशनातून दिसून आले. बदलत्या जीवनशैलीमुळे जिथे आपल्यापैकी बहुतेक फास्ट फूडचे, प्रोसेस्ड, स्मोक्ड आणि रेड मीट यांसारख्या पदार्थांचे सेवन करतात. परिणामी कॅन्सरसारख्या आजारांचा धोका ओढावू शकतो. कॅन्सरच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमागे आपला आहार हे प्रमुख कारण असल्याचे सांगितेल जाते. या पदार्थांमुळे कॅन्सरच्या पेशींशी लढण्याची शक्ती संपते. त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो ते जाणून घ्या.
तळलेले अन्न
जेव्हा आपण खूप गरम तेलाच अन्न तळतो तेव्हा हेटरोसायक्लिक अमाइन आणि ग्लायकेशन एंड उत्पादने तयार होतात. तळलेले बहुतेक अन्नपदार्थ हानिकारक असल्याचे दिसून आले आहेत. यामध्ये लाल मांस, अंडी ,लोणी, अंड्यातील बलक, तील आणि शेंगदाणे यांचा समावेश आहे.
जेनेटिकली मोडिफाइड फूड
जैवतंत्रज्ञान आणि अनुवांशिक अभियांत्रिकीतील प्रगतीमुळे, अन्नपदार्थांमध्ये अनेकदा नवीन बदल दिसून येतात. जसे की, काही काळापूर्वी तांदूळ तयार करण्यात आला होता ज्यामध्ये व्हिटॅमिन ई असायचे. मात्र आता त्याच तांदळामध्ये पुरेशी व्हिटॅमिन ई नसतात. परिणामी निसर्गात सापडलेल्या अन्नपदार्थांमध्ये बदल करुन त्यांचे स्वत:चे आरोग्यदायी परिणामी देऊ शकतात. म्हणूनच आपल्या आहारामध्य अधिकाधिक सेंद्रिय पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा.
प्रोसेस्ड मटण
भारतात असे अनेक मांसाचे पदार्थ उपलब्ध आहेत ज्यावर प्राण्यांवर प्रक्रिया करुन कॅन केले आहे. यामध्ये बेकन सॉसेज हॉट डॉग इ. हे पदार्थ ताजे ठेवण्यासाठी अनेक रासायनिक संरक्षकांनी सुसज्ज आहेत. हे पदार्थ दिसायला ताजे दिसतात पण त्यांचे सेवन कर्करोगास कारणीभूत ठरु शकते. सोडियम नायट्रेट आणि सोडियम नायट्रेट वाफेचा वापर मांस टिकवण्यासाठी केला जातो. ही दोन्ही रसायने कोलन आणि रेक्टल कॅन्सरसाठी थेट जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. म्हणून, जर तुम्ही मांस खात असाल तर नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले मांस खाण्याचा प्रयत्न करा. कॅन केलेला मांस आणि प्रक्रिया केलेले मांस यांपासून शक्य तितके दूर रहा.
सोडा आणि कोल्डड्रिंक
प्रोसेस्ड मांसाप्रमाणे सोडा आणि कोल्डड्रिंक देखी कॅन्सरला कारणीभूत ठरु शकते. यामध्ये भरपूर चायनीज फूड केमिकल्स आणि कलरिंग एजंट आढळतात. हे सेवन केल्याने शरीरातील आम्लता वाढते. जे कर्करोगासाठी कारणीभूत ठरु शकते.
मैदा
गव्हापासून मिळणाऱ्या सर्व उत्पादनांमध्ये पांढरे पीठ हे आरोग्यासाठी सर्वात धोकादायक आहेत. मैद्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते जे आरोग्यासाठी मोठा धोका आहे.