मुंबई : कान आणि नाक टोचणं आजकाल तरूण मुलींना देखील आवडतं. सनातन संस्कृतीत नाक आणि कान टोचण्याचं विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मातील 16 संस्कारांपैकी हा एक संस्कार मानला जातो. पिअर्सिंग करताना म्हणजेच कान टोचून घेताना काही नियम पाळावे लागतात. मुख्य म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नाक किंवा नाक टोचणं टाळलं पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसांत पिअर्सिंग केल्याने संसर्ग होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळ्याच्या दिवसांत संसर्ग होत असल्याने हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही पिअर्सिंग करू शकता. दुसरीकडे, उन्हाळ्याच्या दिवसांममध्ये  हवा कोरडी असल्याने पिअर्सिंगनंतर येणारी सूज रोखण्यास ही योग्य वेळ आहे. पावसाळ्यात पिअर्सिंग छेदन केल्यास काही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


सूज येणं


जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कान किंवा नाक टोचून घेत असाल तर त्यानंतर तुम्हाला 4-5 दिवस सूज राहू शकते. पावसाच्या दिवसांमध्ये सूज अधिक येण्याची शक्यता असते कारण आर्द्रतेचं वातावरण यासाठी अनुकूल नसतं. 


रॅशेस येणं


हीट आणि ह्युमिडच्या सीजनमध्ये त्वचेवर लगेच पुरळ उठू शकते. जर तुम्ही पिअर्सिंग केलेल्या भागात घामामुळे पुरळ उठवल्यास संक्रमण होण्याचा धोका अधिक असतो. 


खाज येणं


पावसाळ्यात छेदन पिअर्सिंग केल्यास त्वचा कोरडी पडून त्याला खाज सुटू शकते. तसंच पिअर्सिंग केल्याच्या ठिकाणी अधिक घाम येत असेल तर सतत खाज येऊ शकते. त्याचप्रमाणे नखांनी त्या ठिकाणी हात लावल्यास नखांमध्ये असलेल्या घाणीमुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.