Low Blood Pressure Treatment: सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक आजारांची समस्या जाणवत आहे. कारण जेवणाच्या वेळा, व्यायाम यासारख्या बाबींकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहतो. त्याचबरोबर शरीरातील सारखेचं प्रमाण नियंत्रणात राहावं यासाठी पालेभाज्या आणि फळं खाणं देखील गरजेचं आहे. यामुळे शरीरातील ग्लूकोस मेंटन राहतं. पण काही जणांना आपल्या शरीराला इतकं वेळ देणं कठीण वाटतं. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यात काही जणांना कमी रक्तदाबाचा त्रास जाणवतो. यासाठी जिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर आयुषी यादव यांनी कमी रक्तदाबाच्या रुग्णांना काही टिप्स दिल्या आहेत. यामुळे कमी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीठ: जे लोकं मीठाचं सेवन योग्य प्रमाणात करतात त्यांना लो बीपीचा त्रास जाणवत नाही. कारण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात सोडियमची आवश्यता असते. कारण कमी सोडियमचं सेवन असल्यास लो बीपीचा त्रास जाणवतो. 


लिंबू पाणी: आरोग्याच्या दृष्टीकोनातून लिंबू पाणी फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर तुम्ही लिंबूपाणी घेऊ शकता. बरेच लोक एक ग्लास कोमट पाणी, लिंबू आणि मधाचे द्रावण पिऊन सकाळची सुरुवात करतात. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी लिंबू देखील सर्वोत्तम मानले जाते.


आलं: ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. लोकं शतकानुशतके आलं वापरत आहेत. आल्याचं दररोज सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. तुमचं कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात आणते.  एका अभ्यासानुसार, आलं चघळल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.


दारू पिऊ नका: दारूचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. रोजच्या सेवनाने रक्त आणि अंतर्गत धमन्या खराब होतात आणि त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या यकृतावरही दिसून येतो. पण ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, अशा लोकांनी दारूचे सेवन अजिबात करू नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. या बाबींचा अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)