मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. नाहीतर थकवा आणि मुड स्वींग्स सारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे जर तुम्ही योग्य वेळी झोपलात आणि 8 तासांची झोप पूर्ण केलीत, तर तुम्हाला आरोग्याशी संबंधीत कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. परंतु असे लोक देखील आहेत, ज्यांना उन्हाळ्यात रात्रीची झोप येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण येथे आम्ही तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येपासून कशी सुटका मिळवू शकता ते सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झोप येण्यासाठी घरगुती उपाय


पायांच्या तळव्याची मालिश


रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने झोप चांगली लागते. दुसरीकडे, जर तुम्हीही झोपेच्या कमतरतेने त्रस्त असाल, तर रोज रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीच्या तेलाने मसाज करा. असे केल्याने तुमचा थकवा दूर होईल, यासोबतच तुम्हाला चांगली झोप लागेल.


पायांच्या तळव्याला मसाज केल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन शांत राहते.


 हळदीचे दूध


जर तुम्हाला आराम हवा असेल, तसेच चांगली झोप हवी असेल, तर रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घ्या. आम्ही तुम्हाला सांगतो की हळदीमध्ये अमीनो अॅसिड असते. त्यामुळे दुधासोबत याचे सेवन केल्याने चांगली झोप येते. त्यामुळे झोपण्याच्या ३० मिनिटे आधी हळदीचे दूध प्यावे.


ध्यान


जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल, तर तुम्ही रोज ध्यान करावे. झोप न येण्याचे कारण चिंता आणि तणाव हे देखील असू शकते. अशा स्थितीत जर तुम्ही रोज ध्यान केले, तर तुमचे मन शांत राहते. कारण ध्यान केल्याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)