मुंबई : डायबेटीज हा असा आजार आहे की यामध्ये रुग्णांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या रुग्णांनी आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल आणि जे आरोग्यासाठी फायदेशीर असतील. मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत भरपूर फायबर आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. आपण संपूर्ण दिवसाच्या घेत असलेल्या आहारात चपाती हा प्रमुख आणि महत्वाचा पदार्थ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चापातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पिठाचा रुग्णाच्या ब्लड शुगरवर खूप परिणाम होतो. काही प्रकारचे पीठ साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतात.


मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रकारच्या पिठाच्या सेवनाने साखरेवर नियंत्रण तर राहतंच शिवाय शरीराला ऊर्जाही मिळण्यास मदत होते. चला जाणून घेऊया कोणत्या चार प्रकारच्या पीठाने मधुमेही रुग्णांच्या शरीरातील ब्लड शुगर नियंत्रणात राहते.


बेसनाची पोळी 


चण्याच्या पिठात खनिजं, जीवनसत्त्वं, फायबर आणि भरपूर प्रथिनं असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि शरीर निरोगी राहते. या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करण्यात प्रभावी ठरतो. या पिठापासून बनवलेली पोळी चांगलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि हृदय निरोगी राहतं.


बाजरीचं पीठ 


ज्या रूग्णांच्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे त्यांनी बाजरीच्या पीठाचा वापर करावा. बाजरीच्या पीठात भरपूर फायबर असते आणि ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरतं. शिवाय हे पीठ हळूहळू पचतं आणि ग्लुकोज तयार करण्यास वेळ लागतो. याच्या सेवनाने डायबेटीज नियंत्रणात राहतो.


सोया


सोयाबीनच्या पीठाची पोळी खाल्ल्याने साखरेचं प्रमाण नियंत्रण राहतं. एका संशोधनानुसार, सोयामध्ये आयसोफ्लेव्होन आढळतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. हे शरीरातील ग्लुकोज टॉलरेन्स देखील वाढवू शकतं. या पीठाच्या पोठीचं सेवन केल्याने डायबेटीज नियंत्रणात राहतो. शिवाय ही पोळी कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं आणि हृदय निरोगी ठेवतं.