डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आहारात या 5 गोष्टींचा करा समावेश
डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करावा. जेणेकरुन डोळ्याचे आरोग्य चांगले राहिल.
मुंबई : आज बहुतेक लोकं मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपवर जास्त वेळ काम करतात. त्यामुळे अर्थातच डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे लाल होणे अशा समस्या लोकांमध्ये वाढत आहेत. पण काम तर करावेच लागणार. पण काम करत असताना डाएटची काळजी घेतली तर डोळ्यांची समस्या दूर होऊ शकते.
तुम्हीही सतत लॅपटॉपवर काम करत असाल तर तुमच्या खाण्याच्या सवयी तुम्ही बदलल्या पाहिजेत. आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहिल.
डोळे निरोगी ठेवणारे पदार्थ (Foods for Eyes)
पालेभाज्या : अनेकांना पालेभाज्या खाणे आवडत नाही, परंतु लक्षात ठेवा डोळ्यांसाठी ते खूप फायदेशीर आहे. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे डोळ्यांसह शरीरातील अनेक अवयवांना योग्य कार्य करण्यास मदत करतात. हिरव्या भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे मोतीबिंदूचा धोका कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला तुमची दृष्टी सुधारायची असेल, तर आहारात हिरव्या भाज्यांचा अवश्य समावेश करा.
अंडी : अंडी खाऊनही डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. अंड्यातील पिवळ्या बलकांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे हिरव्या भाज्यांमध्ये असतात. हे
निरोगी डोळ्यांसाठी सर्वोत्तम अन्न आहे. शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळावे, यासाठी नाश्त्यात अंडी खावीत.
बदाम : हा एक उत्तम सुका मेवा आहे, ज्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई देखील चांगले असते. ज्याचा वापर डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.
टोमॅटो : टोमॅटो देखील डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये ल्युटीन, लाइकोपीन नावाचे घटक असतात, जे दृष्टी वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स डोळे निरोगी ठेवतात, डोळ्यांची पाहण्याची क्षमता वाढवतात.
ब्रोकोली : डोळ्यांना कोणत्याही आजारापासून वाचवायचे असेल तर भाज्यांमध्ये ब्रोकोलीचा समावेळ करा. ब्रोकोली रेटिनाला कोणत्याही प्रकारच्या रॅडिकलपासून मुक्त ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते. भाज्यांमध्ये असलेले सल्फोराफेन डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.