Natural Weight Gainer Home Remedies : काही लोक त्यांच्या बारीक यष्टीमुळे खूप अस्वस्थ असतात. हे लोक कितीही खातात, पण त्यांचं वजन वाढत नाही. बारिक यष्टीमुळे त्याची अनेक ठिकाणी खिल्लीही उडवली जाते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. आहारात या पदार्थांचा समावेश करा जेणेकरून तुमची शरीर यष्टीमुळे सुदृढ होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेवणासोबत रोज दूध घ्या
दुधात प्रथिने, कॅल्शियम, कार्ब्स, फॅट्स, मिनरल्स आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. साधे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तूप किंवा ड्रायफ्रुट्स टाकून प्यायला सुरुवात करा, ही पद्धत वजन वाढवेल.


ड्रायफ्रुट्स खा
जर तुम्हाला वजन झपाट्यानं वाढवायचं असेल तर सुका मेवा खूप प्रभावी ठरू शकतो. त्याचा आहारात समावेश केल्यास चांगले परिणाम मिळतील. सुका मेवा विविध प्रकारच्या अँटी-ऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे आणि त्यात प्रथिने, कॅल्शियम आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील भरपूर असतात ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.


तुपाच्या सेवनाने वजन वाढेल
तुप वजन वाढवण्याचा हा एक उत्तम स्रोत मानला जातो. एवढंच नाही तर ते तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. गूळ मिसळून रोटीसोबत खाऊ शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही प्रचंड वाढते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तीचा अवलंब करण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)