मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला. यानंतर आता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होताना दिसत असून राज्यातील रूग्णसंख्येत घट दिसून येतेय. एकीकडे कोरोना कमी होत असताना दुसरीकडे मात्र म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत वाढ झाली असल्याचं निदर्शनास आलं आहे. इतकंच नव्हे तर मृत्यूंचा आकडाही वाढला असल्याची नोंद करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या परिस्थितीत राज्यभरात 7395 रूग्ण असून 644 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर राज्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 9 टक्क्यांवर आहे.


यामध्ये सर्वाधिक रूग्ण हे पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत असल्याची माहिती आहे. गेल्या महिन्याभराची आकडेवारी पाहिली तर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे 80 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे मृतांच्या संख्येतही 83 टक्क्यांनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.


म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची नोंद मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करण्यात आली आहे. यावेळी मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये 1487 म्युकरमायकोसिसच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये 107 रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र जूनच्या मध्यापर्यंत रूग्णसंख्येच्या आलेखामध्ये 7 पटीने वाढ झाली आहे. 


 

रुग्णसंख्या

मृत्यू

पुणे

1215

85

नागपूर          

1184

101

औरंगाबाद

700

51

मुंबई (शहर)

437

40

उपनगर

159

18

नाशिक

542

57

सोलापूर

423

36

ठाणे

245

32

सांगली

239

14


दरम्यान राज्यामध्ये म्युकरमायकोसिसचे 30 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. राज्यातील एकूण 7395 रूग्णांपैकी 2212 रूग्ण बरे झाले आहेत. तर 4463 रूग्णांवर सध्या राज्यामध्ये उपचार सुरु आहेत.