मुंबई : भारतीय जेवणामध्ये मसाल्यांचा वापर फार अनोख्या पद्धतीने केला जातो. विविध मसाल्यांच्या वापरामुळे जेवणाला चव येते. मात्र मसाल्यांमुळे फक्त जेवणाची चव वाढत नाही तर पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत मिळते. स्वयंपाक घरातील हे मसाले पचनसंस्थेला योग्य कार्य करण्यास खूप मदत करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या रामचंद्र विद्यापीठाच्या बायोकेमिस्ट्री विभागाच्या हर्बल अँड इंडियन मेडिसिन रिसर्च लॅबोरेटरीने केलेल्या अभ्यासात भारतीय मसाले हृदयासाठी आरोग्यदायी आहेत हे दाखवून दिलं आहे. 


आलं


स्वयंपाकघरात आल्यामध्ये कार्मिनेटिव घटक असतात. हा घटक आतड्यांसाठी फायदेशीर असतो. आल्याचा चहा प्यायल्यास पोटात गॅस तयार होणं किंवा अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.


हळद


हळदीचा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. भारत आणी चिनी औषधांमधे हळद ही पोटदुखी, दात दुखी, छातीत दुखत असल्यास शिवाय मासिक पाळीच्या समस्यांवरील उपचारासाठी वापरण्यात येते. डायबेटीज, किडनीचा त्रास असलेल्यांसाठी सुद्धा हळद उपयुक्त ठरते. मायोकार्डियल इन्फेक्शन आणि फुफ्फुसांच्या आजारावर हळद फायदेशीर असल्यातं अभ्यासातून समोर आलं आहे.


काळी मिरी


पचनासाठी तसंच वजन कमी करण्यास काळ्यामिरीचा वापर केला जातो. फॅट सेल्सचं विघटन करण्यासाठी काळी मिरी उपयोगी ठरते. यामध्ये व्हॅनेडियम असल्याने हृदययाच्या आजारांचा त्रास असलेल्यांना फायदा होतो. अनेक संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, हृदय निरोगी राखण्यात काळी मिरी मदत करते.


हिंग


अॅसिडीटी तसंच आंबट ढेकर याच्या उपचारांसाठी हिंग अतिशय उपयुक्त मानलं जातं. हे गॅस, अपचन आणि पोटाच्या कोणत्याही समस्यांवर उपचार करण्यास मदत होते. यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरीआणि पाचक गुणधर्म आहेत ज्यामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.