मुंबई : भारताने आज ऐतिहासिक विक्रम केला आहे. देशाने 100 कोटी कोरोना लसीकरणाच्या आकड्याचा पल्ला अखेर गाठला आहे. या विशेष प्रसंगी, पीएम मोदी एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

273 दिवसांत देशाने हे 100 कोटींच्या लसीकरणाचं उद्धिष्ठ गाठलंय. यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरात सेलिब्रेशनची तयारी सुरु केलीये. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रूपात विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यामध्ये औरंगाबादचा बिबिका मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगा खान पॅलेस, मुंबईतली सी.एस.एम.टीला रोषणाई करण्यात येणार आहे.


 


चप्रमाणे तिरंग्याने देशभरात 100 ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगाची रोषणाई करण्यात येणार असून लाल किल्ल्यावर 225 फूट लांब तिरंगा फडकवला जाईल. ज्याचं वजन सुमारे 1400 किलो आहे.


भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं होतं. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंट लाईन वर्कर्सना ही लस देण्यात आली होती. 
यानंतर, लसीचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना काही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना लस देण्यात आली.


लसीकरणाच्या बाबतीत टॉप 5 राज्य


उत्तर प्रदेश -  12,21,40,914
महाराष्ट्र - 9,32,00,708
पश्चिम बंगाल - 6,85,12,932
गुजरात - 6,76,67,900
मध्य प्रदेश - 6,72,24,286