Influenza Symptoms: तुम्हाला लहान मुले असतील तर सावधान! वेळीच त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण बाहेर खेळताना किंवा हिंडताना ते नकळत वस्तूंना स्पर्श करतात किंवा कोणताही पदार्थ तोंडात टाकतात. त्यामुळे मुलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. सप्‍टेंबर ते नोव्‍हेंबरमध्‍ये तापमानात घट किंवा उष्‍णतेतील चढ-उतार यामुळे मुलांमध्‍ये इन्फ्लूएंझा होण्‍याचा धोका वाढतो. याला फ्लू असे म्हणतात आणि हा संसर्गजन्य रोग आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात लहान मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हवामानातील बदलामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे सुरुवातीला सामान्य दिसतात. परंतु, कालांतराने ते काहीवेळा गंभीर स्वरूप धारण करतात आणि प्राणघातक ठरतात. केवळ लहान मुलेच नव्हे तर प्रौढांनाही याचा त्रास होतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


इन्फ्लूएंझा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामानातील बदलामुळे इन्फ्लूएंझाची तक्रार ऐकायला मिळते.  इन्फ्लूएंझाचा विषाणू हवेत वेगाने पसरतो आणि कमी वेळात जास्त लोकांना संक्रमित करतो. त्याचा परिणाम श्वसनमार्गावरही होतो. इन्फ्लूएंझाचा प्रसार बहुतेकदा तापमानात घट किंवा उष्णतेच्या चढउतारांमुळे होतो. सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यांला भारतात 'फ्लू सीझन' म्हटले जाते आणि या ऋतूत मुलांना फ्लूपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.


लक्षणे काय आहेत?


मुलांमध्ये इन्फ्लूएंझाची लक्षणे पुढीलप्रमाणे असू शकतात. ताप, थंडी वाजून येणे, खोकला, नाक वाहणे  घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा आणि कधी कधी उलट्या आणि पोटदुखी इत्यादींचा समावेश होतो.


काय आहेत कारणे?


मुलांमध्ये ही लक्षणे हवामानातील बदलामुळे उद्भवतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका,. कारण ते फ्लूचे लक्षण असू शकतात. पावसाळा आणि हिवाळ्यात तापमानात चढ-उतार झाल्याने फ्लूचा विषाणू वेगाने पसरतो.


कसा कराल बचाव


मुलांचे इन्फ्लूएन्झा विरूद्ध लसीकरण करा. ते कधी आजारी पडतील हे सांगता येत नाही.


याशिवाय मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. कारण हा फ्लू घाणीमुळेही हल्ला करू शकतो.


मुलांमध्ये इन्फ्लूएंझाची लक्षणे दिसत असतील तर त्यांना शाळेत पाठवू नका किंवा चुकूनही बाहेर खेळू नका. कारण यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.


(Desclaimer: हा लेख केवळ माहिती प्रदान करण्यासाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)