Interesting Facts on Tears: मुलांच्या तुलनेत मुली का जास्त रडतात? असं काय कारण आहे की सुख असो किंवा दुःख, अगदी कांदा कापला तरीही डोळे भरून येतात. जाणून घ्या यामागील हैराण करणारं कारण. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले डोळे. आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. मात्र आपले डोळे हे अत्यंत संवेदनशील असतात. अगदी बारीक धुळीचा कण जरी डोळ्यात गेला तरीही आपल्या पापण्या लगेच मिटतात. झोपताना आपण डोळे मिटून झोपतो. सुखात किंवा दुःखात आपल्या डोळ्यातून पाणी येतं. डोळ्यात पाणी येतं तेंव्हा तुमच्या शरीरातील संपूर्ण विज्ञान काम करत असतं. केवळ सुख, दुःख नाही तर एखादा खास वास आला किंवा जोरात हवा येत असेल तेव्हाही आपल्या डोळ्यातून पाणी येतं. जाणून घेऊयात याबाबतचे भन्नाट फॅक्ट्स. 


भावुक झाल्यावर केवळ माणसाच्याच डोळ्यातून अश्रू येतात


आपल्याला जनावरांपासून वेगळी करणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या डोळ्यात येणारे अश्रू. केवळ माणसाच्याच डोळ्यातून भावुक झाल्यावर अश्रू येतात. आपल्यासोबत काहीतरी चांगलं झालं किंवा एखादी वाईट घटना घडली की आपल्या डोळ्यात पाणी येतं. मात्र, अजूनही आपण भावुक झाल्यावर डोळ्यात अश्रू का येतात हे अनाकलनीय आहे. 


अश्रू येण्याचे फायदे आहेत फायदे


डोळ्यात पाणी येण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपल्या डोळ्यांमधील कोरडेपणा दूर होतो. यामुळे डोळ्यांची चुरचुर कमी होते. सोबतच डोळ्यातील किटाणू साफ होण्यासही अश्रू किंवा डोळ्यात येणारं पाणी मदत करतं. आपल्या अश्रूनलिकांमधील हा तरल पदार्थ पाणी आणि मिठापासून तयार होतो.   


BBC मध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रोफेसर मायकल जो ट्रिंबल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरॉलॉजीच्या प्राध्यापकांच्यामते डार्विनने याबाबत भाष्य केल्याचं म्हंटलंय. भावुक झाल्याने केवळ माणसाच्याच डोळ्यातून पाणी येतं, असं डार्विनने म्हंटलं होतं. त्यानंतर याचं कुणीही खंडन केलं नाही, असंही ते म्हणतात  


रडण्याबाबत देशांची आकडेवारी काय म्हणते?


याबाबत क्लाउडिया हॅमंड म्हणतात की,  रडणं हे प्रत्येकाच्या सांस्कृतिक जडणघडणीवर अवलंबून आहे. एका देशाबाबत बोलायचं झालं तर स्त्री आणि पुरुषांमध्ये रडण्याच्या क्रमवारीत अमेरिकेचा नंबर सर्वात वरचा आहे. सर्वात कमी रडणारे पुरुष बुल्गारिया तर सर्वात कमी रडणाऱ्या महिला आइसलँड आणि रोमानियातील आहेत.  


मुलांच्या तुलनेत मुली जास्त रडतात


प्रोफेसर रोटेनबर्ग म्हणतात, लहान मुलांच्या रडण्यावर बरेच प्रयोग झालेत. याबाबत संशोधन करणं सोपं आहे. मात्र 10-11 व्या वर्षी जेंव्हा मुलं आणि मुलींना आपल्या लैंगिकतेबाबत सजग होतात तेंव्हापासून मुली या मुलांच्या तुलनेत जास्त रडतात आणि हे आजन्म तसंच राहतं. 


अश्रू मुद्दाम तयार करता येत नाहीत


याबाबत रॉबर्ट प्रोलाईन म्हणतात की अश्रूंबाबत एक मोठी समस्या म्हणजे आपल्याला अश्रू मुद्दाम तयार करता येत नाहीत, तुम्ही रडण्याचं सोंग करू शकतात, मात्र आपण अश्रू निर्माण करू शकत नाही.


interesting facts on tears in eyes crying and why girls cry more than boys