मुंबई : उत्तम आरोग्यासाठी सर्व पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. पोषकघटकांचे कमी-अधिक प्रमाण आरोग्याच्या समस्या निर्माण करते. मग एकातून दुसरी आणि त्यातून मग तिसरी समस्या उद्भवते. हे चक्र असेच सुरु राहते. परिणामी स्वास्थ्य बिघडते. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. 


या समस्या निर्माण होतात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. आयोडीनच्या गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर वंधत्व, नवजात बालकात व्यंग निर्माण होण्याचा धोका वाढतो. 


असा होतो परिणाम


मानवी शरीरासाठी आयोडीन हे एक महत्त्वपूर्ण मायक्रो न्युट्रिएंट आहे. जे थॉयरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपो थायरॉईडिज्मची समस्या उद्भवते.


तज्ञांनुसार, महिलांच्या शरीरातील आयोडीन कमतरतेचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन संस्थेवर पडतो. हायपोथायरॉईडिज्ममुळे वंधत्व आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य जेव्हा मंदावते तेव्हा आवश्यक प्रमाणात हार्मोनची निर्मिती होत नाही. याचा अंडाशयात अंड उत्पत्तीवर परिणाम होतो आणि हेच वंधत्वाचे कारण ठरते. 


त्यावर उपचार महत्त्वाचे


हायपो थॉयरॉईडिज्म असलेल्या महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होणे, मासिक पाळीचे चक्र बिघडणे आणि गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होणे, अशा समस्या उद्भवतात. हायपो थॉयरॉईडिज्मची समस्या दूर करण्यासाठी त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर उपचार करुनही जर वंधत्वाची समस्या कायम राहत असेल तर त्यासाठी दुसरे उपचार करण्याची आवश्यकता निर्माण होते.