Most Polluted City In Marathi : जगभरात सर्व प्रकारच्या प्रदूषणाचा कहर वाढत आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी हवेच्या गुणवत्तेची मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यामधून सहा धोकादायक प्रदूषकांची सुधारित पातळीबद्दल सांगण्यात आले असून या सहा प्रदूषकांमुळे मानवी आरोग्यास धोका देखील आहे. तसेच डब्ल्यूएचओच्या मते या प्रदूषकांमुळे उद्भवलेल्या आजारातून दरवर्षी जगभरातून 70 लाख लोकांचा अधिक मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाला प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर या आकडेवारीनुसार भारतातील आकडेवारी चिंताजनक असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामानाबदल, प्रदूषण आणि जैवविविधतेचा ऱ्हास या तिहेरी संकटाचा सामना करत असतानाच प्रदूषणाचे गंभीर परिणाम सातत्याने समोर येत आहे. अशातच स्विस संस्थेच्या IQAir ने जागतिक वायु गुणवत्ता 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला असून यामध्ये 134 देशांची आकडेवारी देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार सरासरी वार्षिक 54.4 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर 2.5 सह भारत देशातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये भारत हा आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश होता, ज्याची सरासरी एकाग्रता 53.3 मायक्रोग्राम प्रति घनमीटर होती. 


स्विस संस्था IQAir ने जागतिक वायु गुणवत्ता अहवाल 2023 हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली पहिल्या क्रमांकावर असून दिल्ली गेल्या चार वर्षापासून सलग चौथ्यांदा अव्वल स्थानावर असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासह भारत प्रदूषणाच्या बाबतीत 134 देशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बिहारमधील बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित महानगर क्षेत्र बनले आहेय. तर दिल्ली सर्वात खराब हवेच्या गुणवत्तेसह (एआयआर क्वालिटी इंडेक्स) राजधानीचे शहर म्हणून नोंदले गेले आहे. 


तसेच या अहवालानुसर पुढील अनेक वर्षांसाठी भारत हा प्रदूषित झोन मानला जाईल. यामध्ये भारत हा एकटाच देश नसून 90 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्या अशा भागात राहते, ज्याचे 2005 च्या प्रदूषण मानकांचे पालन केले जात नाही. परंतु दक्षिण आशिया आणि विशेषत भारत अजूनही जगातील सर्वात प्रदूषित क्षेत्रांपैकी एक आहे. 


प्रदूषणामुळे 'या' आजारांची शक्यता


प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवू शकतात. जसे की, दमा, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेची सामान्य या सारख्या आजारांना सामोरे जावं लागत. प्रदूषणाच्या अतिसंसर्गामुळे डोळ्यात जळजळ होणे, डोळ्यातून पाणी येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे अशा अनेकांना त्रास होतो. याशिवाय लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची समस्या वाढते. यासोबतच हृदय आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार, स्ट्रोक, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ब्रॉन्कस आणि फुफ्फुसाचा कॅन्सर, गंभीर दमा आणि लोअर रेस्पीरेटरी इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार त्यावर काम करत असून गुणवत्तेत सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. WHO चे नियम कोणत्याही देशाला बंधनकारक नसून वैज्ञानिक अभ्यासाद्वारे मूल्यांकन केल्यानुसार हे केवळ मानवी आरोग्यासाठी सुरक्षित मानलेले नियम आहेत.