मुंबई : महिलांना लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा बेली फॅट म्हणजेच पोटाजवळ साठणाऱ्या चरबीमुळे महिलांना अनियमित पीरियड्सची तक्रार उद्भवते. अवेळी पीरियड्सच्या मागे बहुतांशवेळा हार्मोन्समध्ये होणारे बदल हे कारण मानलं जातं. मात्र काही प्रकरणांमध्ये गर्भाशयाला येणारी सूज देखील अनियमित पीरियड्सचं कारण ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भाशयाला सूज आली ती या अवयवाचा आकार वाढतो. ज्यामुळे पोटाच्या खालील भाग वाढल्यासारखा जाणवतो. बऱ्याच महिला समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसतात. मात्र असं करणं योग्य नाही. त्यामुळे गर्भाशयाला सूज येण्याची कारणं आणि उपाय आज जाणून घेऊया.


गर्भाशयाला सूज येण्याची कारणं


  • घट्ट कपडे परिधान करणं

  • जास्त भूक लागणं

  • गॅसेसचा त्रास

  • बद्धकोष्ठता

  • फायब्रॉईड्स

  • ओव्हेरियन सिस्ट

  • शरीराची हालचाल न करणं


कोणती लक्षणं दिसून येतात


गर्भाशयाला सूज आली की महिलांना अनियमित पीरियड्स, वेदना, थंडी लागणं, सतत लघवीला होणं, पाठ दुखणं, थकवा, चिडचिडेपणा, योनीमार्गात जळजळ अशी लक्षणं दिसून येतात. 


यावर उपचार कसे करावे


जर तुम्हाला वर दिल्यापैकी लक्षणं जाणवली तर तातडीने प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांद्वारे तपासणी केल्याने नेमका त्रास समजण्यास मदत होईल. जर फायब्रॉईडमुळे हा त्रास होत असेल तर यावर लायप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे उपचार केले जातात.