ताप येत आहे का? डेंग्यू आहे की व्हायरल ताप, हे कसे ओळखावे
Fever News : डेंग्यू (dengue) आणि इतर प्रकारच्या विषाणूजन्य तापाचा (viral fever) धोका पावसाळ्यात वाढतो आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे.
मुंबई : Fever News : डेंग्यू (dengue) आणि इतर प्रकारच्या विषाणूजन्य तापाचा (viral fever) धोका पावसाळ्यात वाढतो आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे. देशात मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रात सध्या तापसरी दिसून येत आहे. अशा तापाचा अधिक परिणाम मुलांवर दिसून येत आहे. परंतु हा ताप डेंग्यूचा आहे की विषाणूजन्य ताप आला आहे, हे समज नाही. त्याची काय आहेत लक्षणे, ते पाहू.
आज तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला डेंग्यू ताप (dengue fever) आहे की विषाणूजन्य ताप (viral fever) आहे हे ओळखण्यास मदत होईल. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला त्यांची लक्षणे माहीत असणे आवश्यक आहे. जेणेकरून ताप आल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि आवश्यक ती खबरदारी पाळून तुमचे उपचार करू शकता.
डेंग्यू तापाची सामान्य लक्षणे
डेंग्यू ताप हा डास चावल्यामुळे होतो आणि असे मानले जाते की डेंग्यू डास दिवसा चावतो. या तापाची लक्षणे एक ते दोन दिवसात दिसू लागतात. जेव्हा डेंग्यू ताप येतो तेव्हा प्रथम डोळे लाल होऊ लागतात आणि नंतर शरीरात रक्ताचा अभाव असतो. अशा स्थितीत शरीरात अशक्तपणा आणि चक्करही येऊ शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, डेंग्यू तापामध्ये, रुग्ण शरीराच्या वेदनांची तक्रार करतो, तर व्हायरल ताप सहसा सर्दीसह येतो.
जर एखादा रुग्ण तापाने ग्रस्त असेल आणि शरीर दुखत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. अशा स्थितीत त्याला डेंग्यूचा ताप असू शकतो तसेच रक्ताच्या प्लेटलेट्सची चाचणी करणे देखील आवश्यक आहे कारण प्लेटलेट्स डेंग्यू तापामध्ये वेगाने खाली येतात. डेंग्यू ताप उपचारांशिवाय बरा होणे कठीण आहे. तर सर्दीसह येणारा विषाणूजन्य ताप दोन-तीन दिवस घरगुती उपचारानंतर निघून जाऊ शकतो.
त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या
सामान्य ताप (fever) किंवा विषाणूजन्य ताप (viral fever) देखील धोकादायक असू शकतो आणि योग्य उपचार न केल्यास तो डोक्यात जाण्याची जास्त शक्यता शकते. त्याचप्रमाणे डेंग्यू ताप रुग्णाचे शरीर कमजोर करण्याचे काम करतो आणि खूप अशक्तपणा येऊ लागतो. अशा परिस्थितीत कोणत्याही तापामध्ये निष्काळजी राहू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपले उपचार करून घेण्याची गरज आहे.
टीप: (या लेखात प्रकाशित केलेली माहिती सामान्य माहिती आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. 'झी 24 तास' याला दुजोरा देत नाही. म्हणून लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.)