Side Effect Soft Drink News In Marathi : उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. डिहायड्रेशनवर योग्य वेळी उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर काहीजण घसा कोरडा पडला की क्लोड्रिंगस पितात. हे देखील शरीराला तितकेच धोक्याचे ठरु शकते.  विशेषत: तरुणांमध्ये ही क्रेझ पाहायला मिळते.  जास्त शीतपेय प्यायल्याने टाइप -2 मधुमेह, वजन वाढणे आणि इतर समस्या होऊ शकता.  या व्यक्तिरिक्त इन्सुलिन आणि चायपचय देखील व्यत्यय आणते. अभ्यासात असे आढळून आले की, दररोज साखरेचे पेय प्यायल्याने वजन वाढते. यावर उपाय म्हणून उन्हाळ्यात निरोगी आरोग्याच्या दृष्टिने या शीतपेयांऐवजी जुन्या काळातील घरगुती पेयांना पसंती द्यावी असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. 


या आजारांचा धोका 


कोल्ड ड्रिंक्समध्ये जास्त रसायनांचा वापर केला जातो. परिणामी यकृताचे नुकसान होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय मधुमेहासोबत हृदयविकार होण्याची शक्यता असते. सॉफ्ट ड्रिंक्स आणि डाएट सोडामधील साखरेचे प्रमाण आणि इतर घटक आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर तुम्ही जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स पित असाल तर वजन वाढण्याची शक्यता आहे. कारण यामध्ये कॅलरजी जास्त प्रमाणात असतात. 


तसेच 250-300 मिली कोल्ड ड्रिंकमध्ये 150-200 कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.  मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार होण्याची शक्यता असते. लोक रोज थंड पेय पितात, त्यात फॉस्फोरिक ऍसिडमुळे त्यांची पचनक्रिया बिघडते. अन्न पचवण्यासाठी वापरला जाणारा घटक म्हणजे हायड्रॉलिक ऍसिड, जो पोटॅशियम तयार करतो. जेव्हा शीतपेयांमध्ये असलेली रसायने ऍसिडमध्ये मिसळतात तेव्हा त्यांचे चयापचयावर प्रतिकूल परिणाम होतात.


दूषित बर्फामुळे आरोग्याला नुकसान


दूषित बर्फात ई. कोलाय विषाणूमुळे पोटदुखी, जुलाब, गॅस्ट्रो, टायफॉइड, मेनोरेजिया, उलट्या, जुलाब यांसारखे आजार होतात. तसेच बर्फाच्या गोळ्यामध्ये असलेल्या रंगामुळे पोटॅशचे विकार आणि त्वचेचे विकार वाढण्याचा धोका असतो आणि त्यामुळे आतड्यांचा संसर्गही होऊ शकतो. थंड पाणी किंवा शीतपेय, बर्फाचे गोळे, सरबत पिण्याकडं कल वाढला आहे. मात्र, त्यात वापरण्यात येणारा बर्फ कोणत्या पाण्यातून तयार केला जातो आणि त्याचे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात याचा विचार न करता घाईघाईने वापर केला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात लोकांनी रस्त्यावरील पेये पिणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.