दुधासोबत चुकूनही खावू नका हे फळ!
हे कॉम्बिनेशन आरोग्यास अतिशय नुकसानकारक ठरेल.
मुंबई : दूध आणि केळे एकत्र खाणे चांगले की वाईट? या संभ्रमात तुम्ही असाल. काही लोकांना केळे दूध खाणे योग्य वाटते तर काहींजण दूध-केळे एकत्र खाणे हानिकारक असल्याचे सांगतात. पण नक्की केळे आणि दूध एकत्र खाल्याने काय होते, या जाणून घेऊया...
केळे आणि दूध हे कॉम्बिनेशन आरोग्यास हानिकारक ठरते. पण तरी देखील केळे आणि दूधाचे सेवन करायचे असेल तर दूध घेतल्यानंतर २० मिनिटांनी केळे खा.
आयुर्वेदात देखील केळे आणि दूध यांचे एकत्र सेवन करु नये. ते आरोग्यास नुकसानकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदा दूध प्या. आणि त्यानंतर २०-२५ मिनिटांनी केळे खा.
काय होते नुकसान?
केळे आणि दूधाच्या एकत्र सेवनाने शरीरात टॉक्सिन्स उत्पन्न होतात. त्यामुळे एलर्जी होण्याची शक्यता असते.
अस्थमा पेशन्टसाठी दूध आणि केळ्याचे एकत्र सेवन करणे नुकसानकारक ठरते. कारण त्यामुळे कफ होतो. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो.
केळे आणि दूध एकत्र केल्याने त्यातील पोषकघटक नष्ट होतात. त्याचबरोबर या कॉम्बिनेशनमुळे पचनक्रिया खराब होते. याशिवाय आतड्यांना देखील नुकसान पोहचते.