मुंबई :  अनेकांच्या दिवसाचा निम्मावेळ हा ऑफिसमध्ये जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसभरात पाणी पिण्यासाठी घरातून नेलेले पाणी, बाटल्या हे पुरेसे नसतात. त्यामुळे पाण्यासाठी लावलेल्या खास उपकरणातून अनेकजण पाणी पितात. पण अशाप्रकारे पाणी पिणं खरंच आरोग्यदायी आहे का ?  


ग्लास - 


पाणी पिण्यासाठी अनेकदा युज अ‍ॅन्ड थ्रो ग्लास दिले जातात. स्टेरोफॉमचे ग्लास वापरणं आरोग्याला धोकादायक ठरतात. 


अस्वच्छ नोझल 


पाणी पिण्याच्या उपकरणाला अनेकदा थंड आणि गरम पाणी असे दोन पर्याय दिलेले असतात. त्यामुळे त्याझे दोन वेगवेगळे नोझल नियमित स्वच्छ केलेले असतीलच असे नाही. त्यामुळे त्रास होऊ शकतो. 


प्लास्टिक बॉटल -


पाणी भरण्यासाठी अनेकदा प्लॅस्टिक बॉटल ठेवल्या जातात. या मुळात एकदा वापरून फेकून देणं अपेक्षित आहे. पण अनेकदा ती बॉटल पुन्हा वापरली जाते. यामधून प्लॅस्टिकमधील घातक बीपिए घटक शरीरात जाऊ शकतात. 


कॉरोसिव्ह स्टील - 


नळ कोणता आहे ? हे देखील यामध्ये महत्त्वाचे असते. अनेकदा यामध्ये कॉरोसिव्ह स्टील वापरले जाते. जे पाण्यासोबत मिसळले जाते. 


कीटाणू - 


अनेकदा पाण्याची बॉटल बदलताना ती व्यक्ती हॅन्ड ग्लोव्ह्ज वापरत नाहीत. त्यामुळे अनेकदा पाण्यासोबत बॅक्टेरियांची मिसळ होऊ शकते.


शिळं पाणी  - 


खरंतर पाणी कधीच शिळं होत नाही. परंतू अनेकदा बॉटल्समधून त्याचा उपकरणात सोडण्याचा पर्याय हा ठराविक काळाने बदलला जात नाही. अनेक दिवसांच्या बॉटल्स संपेपर्यंत ठेवल्या जातात. परिणामी प्लॅस्टिकमधील घातक घटक शरीरात जाण्याचा धोका वाढतो.