मुंबई : बॉडी ग्रूमिंगच्या नावाखाली अनेकजण विविध प्रयोग करतात. तुम्हीही एकदा वेगळा प्रयोग ट्राय केला असेल. मात्र तुम्हाला माहितीये का हे असे प्रयोग ट्राय करणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. अशीच एक ग्रुमिंग टीप म्हणजे नाकाचे केस काढणं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर, नाकातील केस वॅक्स किंवा ओढून काढणं खूप धोकादायक सिद्ध होऊ शकतं. मात्र, तज्ज्ञांच्या मते, ही सवय तुमच्यासाठी घातक ठरू शकते. ब्रिटिश डॉक्टर करण राजन यांनी सोशल मीडियावर लोकांना नाकातील केस काढू नका असा इशारा दिला आहे.


डॉक्टर करण राजन यांनी इन्स्टाग्रामवर या विषयावर एक पोस्ट टाकली आहे आणि या पोस्टद्वारे लोकांना सांगितले आहे की, नाकाचे केस काढणं त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. त्यांनी डायग्रामद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, नाकाचे केस किती महत्वाचे आहेत आणि ते काढणं आपल्यावर किती परिणाम करू शकतं?


डॉ. करण राजन यांनी लोकांना सुंदर दिसण्यासाठी आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन केलं आहे.


नाकातील केस करतात सुरक्षा


डॉक्टर म्हणतात की, आपल्या नाकाच्या आत दोन प्रकारचे केस असतात. एक सूक्ष्म सिलीया केस(Microscopic cilia), जे नाकातील द्रवपदार्थ फिल्टर करतं हे केस काढून काढण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. डॉक्टर म्हणतात की, जर ते चांगले दिसत नसतील तर त्यांना कापून लहान केलं जाऊ शकतं. हे केस जीवाणू आणि जंतू नाकात येण्यापासून रोखतात. जर ते काढले गेले तर हे जंतू आत जातील आणि संसर्ग होऊ शकतात


ब्रेन इन्फेक्शनचा धोका


डॉ. राजन म्हणतात, की नाकाच्या आतील त्रिकोणामुळे मेंदूचा संसर्ग देखील होऊ शकतो. काही अनुनासिक शिरा नाकात रक्त वाहून नेतात, जे मेंदूच्या रक्तवाहिन्यांशी जोडलेल्या असतात. अशात संसर्ग झाल्यास तो मेंदूपर्यंत सहज पोहोचू शकतो. 


डॉक्टर म्हणतात की, हे पटकन होत नाही, परंतु याची रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळे नाकातील केस वॅक्स किंवा इतर कोणत्याही मार्गाने त्यांना काढून टाकण्याऐवजी त्यांना ट्रिम करा.