Sadhguru undergoes brain surgery: ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सद्गुरु जग्गी वासुदेव यांना गंभीर आणि जीवघेण्या आजाराने ग्रासले होते आणि त्यामुळेच त्यांच्या मेंदूची तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या 4 आठवड्यांपासून सद्गुरुंना तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मेंदूला सूज आली होती आणि ती प्राणघातकही ठरू शकते. ही गंभीर स्थिती लक्षात आल्यानंतर सद्गुरूंवर मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, सद्गुरु गेल्या 4 आठवड्यांपासून गंभीर डोकेदुखीने त्रस्त होते. तपासणीदरम्यान सद्गुरूंच्या मेंदूमध्ये जास्त रक्तस्त्राव आणि सूज असल्याचे आढळून आले. ही दोन्ही लक्षणे गांभीर्याने घेत डॉक्टरांनी सद्गुरूंना मेंदूची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. 17 मार्च 2024 रोजी, सद्गुरूंना मेंदूला सूज आणि मेंदूच्या आत रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाल्यानंतर, त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.


डोकेदुखीसोबत उलट्या सारखी लक्षणे


अपोलो हॉस्पिटnचे वरिष्ठ सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांनी सांगितले की, सद्गुरूंच्या मेंदूमध्ये गंभीर सूज आली होती जी घातक पातळीपर्यंत वाढली होती. सीटी स्कॅनमध्ये ही सूज आढळून आली. सद्गुरुंना गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता, परंतु दैनंदिन काम करताना ते सतत डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत होते. 15 मार्च रोजी वेदना अधिक वाढली आणि 17 मार्च रोजी सद्गुरूंची मज्जासंस्थेची स्थिती गंभीर झाली आणि त्यांना अनेक वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन करताना मेंदूला वाढलेली सूज दिसली. ज्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली.


सद्गुरुंनी शेअर केला व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sadhguru (@sadhguru)


नेमकं काय झालं?


सद्गुरू जग्गी वासुदेव यांना गेल्या चार आठवड्यांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. वेदनांची तीव्रता भरपूर होती. मात्र त्यांनी त्यांचे कार्यक्रम सुरूच ठेवले. 8 मार्च 2024 रोजी रात्रभर महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले. मात्र, 15 मार्च 2024 रोजी दुपारी दिल्लीला पोहोचल्यावर त्यांची डोकेदुखी असह्य झाली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात आणण्यात आले. जेथे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांच्या सल्ल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन दुपारी साडेचार वाजता करण्यात आले. ज्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये सूज आणि रक्तस्त्राव आढळून आला.