मुंबई : इस्रायलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीची यशस्वी मोहीम राबवल्यानंतर आता घरांमध्ये मास्क लावण्याचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. मंगळवारी ही बंदी हटवण्यात आली आहे. दरम्यान विमानांमध्ये आणि आयसोलेशन सेंटरमध्ये जाताना लोकांना अजूनही मास्कचा वापर करावा लागणार आहे. तर ज्या लोकांनी अजून कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांना नर्सिंग होम आणि इतर दीर्घकालीन आरोग्य सुविधांमध्ये मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रायलने जवळपास लोकसंख्येच्या 85% लोकांचं लसीकरण केलं आहे. यानंतर त्यांनी शाळा आणि कॉलेज सुरु केलं. 


दरम्यान परदेशी लोकांचं स्वागत करण्यास थोडी खबरदारी घेण्यात येतेय. इस्रायलमध्ये पर्यटकांना लसीकरणाचं प्रमाण पत्र दाखवावं लागतंय. शिवाय त्यांच्या या प्रमाणपत्राची तपासणीही केली जातेय.


रविवारी इस्रायलमध्ये मोठा राजकीय बदल झाला. संसदेने सरकार स्थापनेला मान्यता दिल्यानंतर घेतलेल्या मतांमध्ये नफ्ताली बेनेट यांना एका मताने बहुमत मिळालं. यासह इस्त्रायलचे माजी पंतप्रधान बेंजमिन नेतान्याहू यांचा 12 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. एक सदस्य नसतानाही सरकारला 60 मते मिळाली आणि विरोधकांना 59 मते मिळाली.