मुंबई : कांद्याचा वापर जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात केला जातो. कांद्याचा वापर भाज्या, सॅलड आणि इतर अनेक पदार्थ बनवण्यासाठी करतात. ज्यावेळी उन्हाळा येतो तेव्हा बहुतेक भारतीय घरांमध्ये त्याचा वापर वाढतो. पण याचं कारण तुम्हाला माहीत आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात कांदा केवळ पदार्थांची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तर आज जाणून घेऊया या ऋतूमध्ये तुमच्या सॅलड प्लेटमध्ये कांदा असणं महत्त्वाचं का आहे. 


हृदयासाठी फायदेशीर


कांद्यामध्ये एंटीऑक्सीडेंट असतं जे कोलेस्ट्रॉल लेवल घटवण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे हृदयाचे आजार होण्याची शक्यता कमी असते. शिवाय ब्लड प्रेशरला नियंत्रणात राहण्यास मदत होते.


ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते


कांद्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. पब मेडच्या संशोधनात असं आढळून आलं की, लाल कांद्याचे सेवन केल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. 


इंफेक्शनपासून दूर राहण्यास


कांद्याचं सेवन केल्याने अनेक इन्फेक्सनपासून दूर राहण्यास मदत मिळते. यामध्ये असलेली एंटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज अनेक बॅक्टेरियांपासून लढण्यास मदत करतात.