मुंबई :  प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडीसाखरेमुळे कमकुवत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास, ताण तणाव हलका करण्यास मदत होते. तसेच घशातील खवखव, खोकला दूर करण्यास मदत होते. कफाचा खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर मदत करते.


कफाचा त्रास कमी करण्यासाठी कशी वापराल खडीसाखर


काळामिरी आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन एकत्र वाटावी. या मिश्रणाची बारीक पूड तयार करा.


चहामध्ये हे मिश्रण एकत्र करून दिवसातून पिणे हितावह आहे. यामुळे  तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच कफाचा त्रास नियंत्रणात राहतो. काळामिरी आणि मधाचे मिश्रणदेखील दूर ठेवेल कफाचा त्रास !


खडी साखर ही कच्चा स्वरूपातील साखर आहे. त्यामुळे नेहमीच्या वापरातील साखरेपेक्षा खडीसाखर खाणे अधिक फायदेशीर ठरते. 
ग्लासभर पाण्यात खडीसाखरेची पूड मिसळली जाते. यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यास मदत होते. तसेच ताणदेखील हलका होतो. ग्लुकोजमधून मिळणारी उर्जा इंद्रियांना शांत करते.


 साखरेतून मिळणार्‍या कॅलरीबाबत काय ?



‘हेल्दी फाय  मी’ नुसार एक टीस्पून नेहमीच्या वापरातील साखरेतून 12 कॅलरीज मिळतात. तर एक टीस्पून खडीसाखरेतून 10 कॅलरीज मिळतात.


कोणताही पदार्थ प्रमाणात खाणे हितकारी आहे. त्यामुळे अतिप्रमाणात साखर खाऊ नका. स्त्रियांनी साखर प्रतिदिन 100 कॅलरीज आहारात घ्यावी  तर पुरूषांच्या आहारात 150 कॅलरीज पुरेशा आहेत.


मधूमेही आणि खडीसाखर


मधूमेहाच्या रुग्णांनी साखरेऐवजी इतर स्विटनिंग एजंट वापरणे चूकीचे आहे.  गूळ, साखर आणि खडीसाखर हे तिन्ही पदार्थ उसापासूनच बनतात. पोषणद्रव्यांच्या तुलनेत साखरेपेक्षा खडीसाखर अधिक चांगली असली तरीही साखरेचे प्रमाण समानच आहे.