तुम्हीसुद्धा करत आहात अशा चुका?, किडनी फेल होण्यापासून वाचवा!
तुम्हीही या सवयी लावून घेतल्यात तर होणार नाही `किडनी फेल`
Kidney Failure Risk : आपल्या शरीरात दोन्ही किडनींचे महत्त्व खूप जास्त आहे, त्यामुळे काळजी घेणे खूप आवश्यक आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्या खराब झाल्या तर तुम्ही तुमचा जीव गमावू शकता. मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब या आजारांमुळे किडनीला खूप त्रास होतो. (kidney failure risk symptoms what are common causes urine high blood pressure diabetes Health Marathi News)
किडनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका कमी होतो. किडनी फेल्युअर कसं टाळता येईल.
किडनी फेल्युअर टाळण्यासाठी उपाय
स्वतःला निरोगी ठेवा आणि शारीरिक हालचाली कमी होऊ देऊ नका.
किडनीच्या आरोग्यासाठी हे पहिले पाऊल असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवा.
साखरेची पातळी नियंत्रणात ठेवा कारण मधुमेहाच्या रुग्णांना जास्त धोका असतो.
रोजच्या जेवणात फक्त सकस आहाराचा समावेश करा, हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
पाण्याचे सेवन खूप कमी किंवा जास्त होऊ देऊ नका, यामुळे मूत्रपिंड फिल्टर होण्यात समस्या निर्माण होतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे.
तुमचे वजन वाढू देऊ नका, पोट आणि चरबी कमी करण्याचा प्रयत्न करा.
दररोज मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवा, कारण ते बीपी वाढवते.
डॉक्टरांच्या मते, दिवसभरात फक्त 5 ते 6 ग्रॅम मीठ खावे.
तुमची ढासळणारी जीवनशैली बदला आणि योग्य दिनचर्या पाळा.
फक्त ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा, शिळे खाल्ल्याने किडनी खराब होईल.
सिगारेट, बिडी, हुक्का किंवा इतर कोणत्याही पद्धतीचे धूम्रपान करू नका
काही औषधांमुळे किडनी खराब होते, त्यामुळे कोणतीही औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दारूचे सेवन हे किडनी खराब होण्याचं प्रमुख कारण आहे.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.