मंबई: कोणत्या पद्धतीने ‘KISS’ (चुंबन)  केल्यावर अधिक आनंद मिळतो हे आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल. पण, आपल्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल की, कोणत्या पद्धतीने केलेला ‘KISS’ जोडीदाराला मुळीच नाही आवडत. मग हा जोडीदार स्त्री असो की पुरूष. म्हणूनच जाणून घ्या काणत्या प्रकारे किस करू नये....


‘KISS’ करताना हे प्रकार टाळा


ब्लड ‘KISS’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोडीदारला त्या प्रकारचा ‘KISS’ मुळीच नाही आवडत. ज्यामध्ये ओठांवर रक्त (ब्लड) येते. ‘KISS’ करताना पुरूष जोडीदाराकडून अनेकदा असे होते. स्त्री जोडीदाराचा खालचा ओठ चावला जातो. त्यामुळे त्यातून रक्त येऊ लागते, अशा बॉयफ्रेंडपासून मुली जरा दूर राहणेच पसंत करतात. हा प्रकार मुलींकडूही मुलांसोबत होऊ शकतो.


फिश टॅंक ‘KISS’


होय हा ‘KISS’ तर अनेकांना मुळीच आवडत नाही. इतका की तो अनेकांना तो किळसवानाही वाटू शकतो. अशा प्रकारच्या ‘KISS’ मध्ये जोडीदार त्याची जिभ सहजोडीदाराच्या तोंडात अधीक वेळ ठेवतो. या प्रकारच्या ‘KISS’मुळे जोडीदाराचा श्वासही गुदमरू शकतो. त्यामुळे अशा प्रयत्नात असाल तर, सावधान...


जीभेने तोंड चाटने


या प्रकारच्या ‘KISS’चा तर, जोडीदाराला प्रचंड संताप येऊ शकतो. अनेक जोडीदारांना सवय (घाणेरडी) असते. ‘KISS’ करताना ते उत्साहात आले की, आपल्या जिभेने सहजोडीदाराचे तोंड चाटायला सुरूवात करतात. खरेतर महत्त्वपूर्ण क्षणी जोडीदाराकडून अपेक्षा उंचावलेल्या असतात. हा पठ्ठा मात्र, आपल्या जिभेने जोडीदाराचे तोंड चाटण्यातच भान हरवलेला असतो. इतका की, त्याचे जोडीदाराच्या‘त्या’भावनांकडे (उदा. गप्पा मारणे वैगेरे) लक्षच नसते.


व्हाईस ‘KISS’


सर्व प्रकारच्या ‘KISS’मध्ये व्हाईस ‘KISS’ हा सर्वात विचित्र आणि विनोदी प्रकार आहे. जो जोडीदारच नव्हे तर, आजूबाजूच्या मंडळींनाही आजीबात आवडत नाही. या किस प्रकारात जोडीदार ‘KISS’ करताना तोंडाने आवाज काढतो. या ‘KISS’प्रकाराचा धोका असा की, यामुळे उत्तेजना वाढण्याऐवजी कंटाळलेपणच वाढण्याचीच शक्यता असते.  कारण त्यांना हा आवाज कोणी ऐकेल याची भिती जोडीदाराच्या मनात असते. त्यामुळे ‘KISS’ म्हणजे नको रे बाबा अशी भावना जोडीदाराच्या मनात नर्माण होते.


थोडक्यात पण विशेष महत्त्वाचे


वरील ‘KISS’चे प्रकार पाहिल्यावर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल. मग ‘KISS’ करायचा तरी कसा? पण, लक्षात ठेवा, शेवटी ‘KISS’ करणे ही सुद्धा कलाच आहे. जी एक दोन अनुभवात कोणाला सहज साध्या होईल असे नाही. त्यासाठी तुम्हाला स्वत:च्या जबाबदारीवर प्रयत्न करावा लागेल. नाहीतर....!