Kitchen Tips: स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्रेशर कुकर. डाळ, भातयासह अन्य पदार्थ चटकन शिजवण्यासाठी प्रेशर कुकर कामी येतो. बाजारात प्रेशर कुकरचे अनेक प्रकार सध्या येत आहेत. अशावेळी कोणता प्रेशर कुकर जेवण शिजवण्यासाठी बेस्ट असू शकतो? असा प्रश्न गृहिणींना पडतो. अनेकदा तर स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियम यातील कोणता प्रेशर कुकर घ्यावा, असा प्रश्नही पडतो? या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अ‍ॅल्युमिनियम आणि स्टील कुकरचे नुकसान आणि फायदे या दोन्ही गोष्टींचे महत्त्व आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


अ‍ॅल्युमिनियम प्रेशर कुकरचे फायदे


अॅल्युमिनियम प्रेशर कुकर वजनाने हलके असतात अशावेळी त्याचा वापर करणे सोप्पं असते. त्याचबरोबर, अ‍ॅल्युमिनियम लवकर गरम होते. अशावेळी जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. त्याचबरोबर अ‍ॅल्युमिनियम धातू स्वस्त असल्याने या प्रेशर कुकरची किंमतही जास्त महाग नाहीये. 


अ‍ॅल्युमिनियम प्रेशर कुकरचे नुकसान


अ‍ॅल्युमिनियम प्रेशर कुकर लवकर काळे पडतात. ऑक्सीकरण झाल्याने त्याची चमक फिकी पडते. अशावेळी या प्रेशर कुकरची स्वच्छता ठेवणे किचकट काम आहे. त्याचबरोबर या कुकरमध्ये जेवण बनवणे आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायक मानले जाते. कारण, काळी काळानंतर हा धातु जेवणात मिसळतो व जेवण टॉक्सिक बनवते. 


स्टील प्रेशर कुकरचे फायदे 


स्टील प्रेशर कुकरची स्वच्छता राखणे सहज शक्य असते. अनेक वर्षानंतरही त्याची चमक कायम ठेवणे शक्य होते. तसंच, स्टील धातु जेवणात मिसळत नाही. त्यामुळं तुम्ही शिजवत असलेले जेवण हेल्दी असते. यात तुम्ही आंबट-चिंबट जेवणाबरोबर सगळ्या प्रकारची व्यंजन शिजवू शकता. 


स्टील प्रेशर कुकरचे नुकसान


स्टील प्रेशर कुकर अ‍ॅल्युमिनियमच्या तुलनेत वजनाने अधिक जड असतो. तसंच, स्टील गरम होण्यासाठी जास्त वेळ घेते. त्यामुळं अन्न शिजवण्यासाठी जास्त गॅस आणि विजेची गरज लागते. त्याचबरोबर स्टीलचे कुकर बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य प्रेशर कुकरच्या तुलनेत महाग असतात.


अन्न शिजवण्यासाठी कोणता कुकर वापराल?


अ‍ॅल्युमिनियम प्रेशर कुकर स्टीलच्या तुलनेत वजनाने हलके आणि स्वस्त असतात. अशातच कमी बजेट असेल तर तुम्ही तुमच्यासाठी तो पर्याय उपलब्ध आहे. कारण यात अन्न शिजवण्यासाठी वेळेची आणि गॅसची बचत होते. पण यात शिजवलेले अन्न शरीरासाठी योग्य नसते. यातील जेवण हेल्दी नसते. त्यामुळं शक्यतो जेवण बनवण्यासाठी स्टील कुकरचाच वापर करावा.