मुंबई : लैंगिक संबंध जोडप्यांच्या नात्यासोबत शरीरावरही परिणाम करतं. लैंगिक संबंधांपासून ज्या व्यक्ती दूर राहतात त्या व्यक्ती सेक्सपासून मिळणाऱ्या आरोग्याच्या फायद्यांपासूनही दूर राहतात. दीर्घकाळ शारीरिक संबंध न ठेवल्यास मेंदूही योग्यरित्या काम करू शकत नाही. जाणून घेऊया सेक्स न केल्याने नेमके कोणते नुकसान होतात.


इम्युनिटीवर होतो परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेक्स न केल्यास तुम्ही आजारी पडू शकता. लैंगिक संबंधांपासून दूर राहिल्यानंतर इम्यून सिस्टिमला जास्त मजबूती मिळत नाही. ज्यावेळी तुम्ही सेक्स करता त्यावेळी शरीरात इम्यूनोग्लोबिन केमिकल वाढतं, जे संसर्गापासून दूर राहण्यास मदत करता.


मेंदू योग्यरित्या काम करत नाही


नियमित रूपात शारीरिक संबंध ठेवल्यास डोक्यात गुड हॉर्मोन विकसीत होतात. जे तणाव कमी करण्यास मदत करतात. जर तणाव अनियंत्रित राहिला तर चिडचिड, झोप न येणं, राग यांसारख्या भावना समोर येतात. ज्यामुळे तुमच्या मेंदू योग्यरित्या काम करत नाही.


त्वचेवर वाईट परिणाम


शारीरिक संबंध ठेवल्याने तुम्ही जास्त काळ तरूण राहता. सेक्स केल्याने फील-गुड हार्मोन्स वाढवतात आणि शरीरात रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे तुमची त्वचा चांगली होते आणि तुम्ही त्वचेच्या समस्यांपासून दूर राहता. पण सेक्स न केल्याने तुमच्या त्वचेला ग्लो मिळत नाही.