प्रशांत अंकुशराव, झी २४ तास, मुंबई : राज्यात उष्णतेची लाट आल्यानं उकाडा वाढला आहे. त्यात होळीचा (Holi) सणही आला आहे. अशावेळी प्रत्येकानं आपल्या डोळ्यांची (Eye Health) काळजी घेणं आवश्यक आहे. ती काळजी नेमकी कशी घ्यावी, हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (know how to care your eyes in summer see details) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे डोळे. डोळे आहेत म्हणून दृष्टी आहे आणि दृष्टी आहे म्हणून रंगीबेरंगी सृष्टी आहे. पण डोळ्यांची काळजी घेतली नाहीत तर ही सृष्टी कायमची दृष्टीआड होऊ शकते. सध्या सूर्यनारायण आग ओकतोय. 



सगळ्यांना उन्हाचे चटके बसतायत. त्यात होळीचा सण आलाय. उन्हापासून आणि होळीच्या रंगांपासून आपल्या डोळ्यांची काळजी घ्यायला हवी. नाहीतर होळीच्या आनंदात आयुष्यातले रंग गायब होण्याची भीती आहे. 


डोळ्यांची नेमकी काळजी कशी घ्यावी?


डोळे स्वच्छ पाण्यानं वारंवार धुतले पाहिजेत. उन्हापासून संरक्षणासाठी डोळ्यांवर काळा चष्मा लावावा. डोक्यावर टोपी किंवा कपडा टाकून बाहेर पडावे. भरपूर पाणी प्यावे.  सन स्क्रीन लोशन डोळ्यात जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. कॉन्टॅक्ट लेन्स घालून होळी खेळू नये. रंग डोळ्यात जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. पर्यावरणपूरक रंगानं होळी खेळावी. 


यात थोडी जरी चूक झाली तरी ती डोळ्यांवर बेतू शकते. एप्रिल मे महिन्यात उन्हाचा उकाडा आणखी वाढणार आहे. अशावेळी केवळ डोळ्यांचीच नव्हे, तर तुमच्या आरोग्याचीच काळजी घ्यावी लागणार आहे.