मुंबई: तोंडाच्या कोपऱ्यात असलेली अक्कलदाढ (Wisdom Teeth) जेव्हा मोठी होत असते तेव्हा त्याचा खूप त्रास होतो. कधी-कधी त्यामुळे इतकी वेदना (Pain) होते की माणसाला भयंकर त्रास होतो. अक्कलदाढेच्या दुखण्यामुळे हिरड्या फुगायला लागतात, काही वेळा रक्तही येतं. अशा परिस्थितीत दाढ पूर्णपणे काढून टाकणे हा एकच उपाय असतो. परंतु जर तुमच्या घराजवळ डेंटल क्लिनिक (Dental Clinic) नसेल आणि दुखण्यापासून त्वरित आराम हवा असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्कलदाढेचं दुखणं थांबवण्यावर उपाय काय? 


1. बर्फाने शेकणं 


जेव्हा शरिराला दुखापत होते तेव्हा दुखत असलेल्या भागाला बर्फाने शेकवतात. अक्कलदाढ दुखीवरही हा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी कापडात बर्फाचे छोटे तुकडे ठेवून गालावर हलक्याने शेकवा. वेदनेपासून मुक्त होण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. 


2. मीठाच्या गुळण्या


मीठ हे दातांसाठी उपयुक्त असं औषध मानले जाते. जेव्हा अक्कलदाढेचं दुखणं असह्य होत असेल तेव्हा मीठाच्या पाण्याने गुळण्या करा. वेदना कमी होऊन लगेच आराम मिळेल.


3. लवंग तेल


तोंडाच्या आरोग्यासाठी लवंग खूप फायदेशीर मानली जाते. वेदना आणि सूज यांवर लवंग रामबाण औषध मानलं जातं. अक्कलदाढेच्या  समस्येसाठी लवंग तेल कापसाला लावून दाढेवर धरा. यामुळे वेदना आणि सूज दोन्ही कमी होतील.


4. हळद


हळद ही अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. हळदीत जंतुनाशक आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहे. अक्कलदाढेचा त्रास दूर करण्यासाठी हळद, मीठ आणि मोहरी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अक्कलदाढेवर लावा पण पेस्ट पोटात जाऊ देऊ नका.


Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. उपाय करण्याआधी वैद्यकीय सल्ला नक्की घ्या. Zee24Taas याची पुष्टी करत नाही.