मुंबई : आंबा हे उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय आणि स्वादिष्ट फळ मानलं जातं. उन्हाळा कोणाला आवडेल? अजूनही पिकलेले आंबे बाजारात आलेले नाहीत. मात्र बाजारात कच्च्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. काही जणांना आंब्यापेक्षा जास्त कैरी आवडते. तुम्हाला माहितीये का कच्चा आंबा तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या आंबा म्हणजेच कैरी चवीसोबतच आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. कैरीमध्ये अनेक पोषक तत्त्वांचा समावेश आहे. कैरीमध्ये असलेले हे पोषक तत्व तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 


कैरीचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर


एसिडीटीपासून आराम मिळतो


कैरीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. शिवाय त्याचा गर आणि सालीमध्ये गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह इफेक्ट आढळतात. त्यामुळे अॅसिडिटीच्या समस्येसाठी हे फायदेशीर ठरतं.


मधुमेह कंट्रोलमध्ये राहण्यासाठी


मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. कारण यामध्ये असलेला अँटी-डायबेटिक इफेक्ट शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचं काम करतो.


इम्यूनिटी वाढवण्यासाठी 


कैरीमध्ये असलेले बीटा कॅरोटीन तुमच्या शरीरात अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं. ज्याच्या मदतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसंच कैरीच्या सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत होते.