Cloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या
Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
Clove Benefits For Men : लवंग (Laung) हा मसाल्याचा पदार्थ आपण सर्वांच्याच घरी असतो. जवळपास प्रत्येक पदार्थात बनवताना आपण त्यात लवंग वापरतो. लवंगाचं जेवणात जितकं महत्व आहे तितकंच महत्व औषध म्हणून देखील आहे. तुम्हाला हे माहित आहे का की ते तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकते. लवंगात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय भाजलेल्या लवंगाची पावडर मधात मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. (Benefits of cloves or Laung)
लवंगात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त यांसारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व आरोग्यासाठी आवश्यक घटक मानले जातात. लवंग ही एक अशी गोष्ट आहे, जी शरीरातील कोलेस्ट्रॉल (high cholesterol) आणि रक्तदाब नियंत्रित करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग गुणकारी आहे. ही शरीरात इंसुलिनसारखे काम करते. लवंगात रक्तदाब (blood pressure) नियंत्रित करणारे गुणधर्म असतात. ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. रक्तदाबाच्या समस्येवर लवंग फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे (Clove Benefits)
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंगा खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात. लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पाचक विकारांना प्रतिबंध होतो.
झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे फायदे
रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत २ लवंगा खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, ज्यामुळे तुम्ही कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करू शकता.
लवंग पुरुषांसाठी फायदेशीर
आपण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनला (cloves benefits in men) त्रास होऊ शकतो, म्हणून लवंग आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने आयुर्वेदाचार्यांच्या देखरेखीखालीच वापरावीत.
सायनसपासून सुटका
सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती (clove helps in immunity) वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते