Mango Variety: `या` सिझनला फक्त हापूसच नाही तर ट्राय करा आंब्याचे `हे` प्रकार!
Types of Mangoes : आपल्या सगळ्यांच्याच घरी आता आंब्यांच्या पेट्या (Mango Variety) आल्या असतीलच. आपल्यापैंकी अनेकांनी हापूस आंब्यांच्या पेट्या आणल्या असतीलच. परंतु या उन्हाळ्यात तुम्ही फक्त हापूसचं नाही तर इतर आंब्यांच्या जातींची (Types of Mangoes) चव जाखू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचा आपल्या आरोग्यासाठी (Health Benefits) फायदा होतो.
Types of Mangoes : सध्या आंब्यांचा सिझन (Mango Season) सुरू झाला आहे. तेव्हा तुमच्याही घरी आता आंब्यांच्या पेट्या आल्या असतीलच. परंतु फक्त अल्फान्जो म्हणजे हापूसचं नाही तर तुम्ही अनेक विविध प्रकारच्या आंब्याचे प्रकारही ट्राय करू शकता. या विविध प्रकारांचेही आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे (Benefits of Mango) आहेत. तुम्ही हे आंबे बाजारातून विकत घेऊ शकता. आता आपल्या घरी हापूसच्या आंब्यांचे विविध पदार्थही करायला सुरूवात झाली असेलच. परंतु तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचे असेल तर तुम्ही आंब्यांचे विविध प्रकारही ट्राय करू शकता. आंबा हा फळांचा राजा असला तरी तुम्ही आंब्यांचे वेगवेगळे प्रकारही ट्राय करू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की आंब्याचे नक्की (Types of Mango) विविध प्रकार कोणते आहेत ते.
आंब्यांचे प्रकार हे अनेक आहेत. काही तुमच्या परिचयाचे असतील अथवा काही तुमच्या परिचयाचे नसतीलही. त्यातून हापूस, रायवळ आणि तोतापूरी आंबा हे प्रकार तुम्हाला माहितीही असतील. परंतु त्याशिवायही असे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला या आंब्यातून आरोग्यदायी फायदेही मिळू शकतात. या आंब्यांच्या प्रकारांमध्ये अनेक व्हिटॅमिन्सही असतात. तेव्हा या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या आंब्यांची संपुर्ण सिस्ट! (know the various types of mangoes and its health benefits health news marathi)
1. गुलाबखास - या आंब्याचा आकार हा गोलाकार नसतो. उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर येथील हा आंबा अत्यंत लोकप्रिय आहे.
2. हिमसागर आंबा - हा पश्चिम बंगाल येथील लोकप्रिय आंबा आबे. याचा रंग हा काहीसा गुलाबी असतो.
3. नीलम आंबा - हाही पिवळ्या रंगाचा गोड लागणारा असा आंबा आहे.
5. दसहरी आंबा किंवा दशहरी आम - या आंब्याचा रंग हा हलका पिवळसर आणि हिरवा असतो. यावर केशरी रंग तुम्हाला फार कमी दिसून येईल. या आंब्यांच्या सालीही पातळ असतात. हा आंब्या अत्यंत गोड असतो. हा आंबा उत्तरप्रदेशातील आहे.
6. चौसा आंबा किंवा चौंसा आम - या आंब्याचा स्वादही अत्यंत गोड असतो. याच्या सालीही पातळसर असतात. याचा रंगही दशहरीप्रमाणे असतो. याचा आकार मात्र बऱ्यापैंकी मोठा असतो.
7. लंगडा आंबा - या आंब्याचा आकार हा गोलाकार असतो. याचा स्वादही गोड असा असतो. हा आंबा छत्तीसगढ येथून येतो.
8. सफेदा आंबा - या आंब्याचा रंग हा काहीसा पांढरा आणि पिवळसर असतो. हा आंबा आंध्रप्रदेशमध्ये लोकप्रिय आहे.
9. तोतापुरी आंबा - हा आंबा थोडासा लांबट असतो. याचा आकारही थोडासा जड असतो.