Health News : श्रावणमास चालू असताना कित्येकांना कधी एकदाचा श्रावण संपतो असं झालं होतं. आता श्रावणमास संपला असून नॉन व्हेज प्रेमी चिकन-मटणावर ताव मारताना दिसत आहेत. मात्र जास्त प्रमाणात मांसाहार करणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, आपल्या आहाराचा संबंध रक्तगटासोबत येतो. त्यामुळे रक्तगटानुसार आपला आहार ठरवला तर त्याच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

O Blood Group
O रक्तगट असणाऱ्यांनी उच्च प्रथिनयुक्त आहार घ्यावा. त्यामध्ये डाळ, मांस, मासे, फळे इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश होतो. तुमच्या आहारात धान्य आणि सोयाबीनसह शेंगांचे प्रमाण संतुलित ठेवा. या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.


A Blood Group
A रक्तगट असलेल्या लोकांनी आपल्या आहारात हिरव्या भाज्यांव्यतिरिक्त टोफू, सीफूड आणि विविध प्रकारच्या कडधान्यांचा समावेश केला पाहिजे. हे लोक ऑलिव्ह ऑइल, दुग्धजन्य पदार्थ, कॉर्न आणि सीफूड यांच्यासोबत उत्तम आहार संयोजन करू शकतात.


मांसाहार कमी प्रमाणात घ्यावा
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, A ब्लड ग्रुपच्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप संवेदनशील असते, त्यामुळे त्यांनी आपल्या आहाराची खूप काळजी घेतली पाहिजे. अशा लोकांना मांसमुक्त आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीर मांस सहज पचवू शकत नाही, म्हणूनच या लोकांना चिकन-मटण कमी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


AB आणि B Blood Group
बी ब्लड ग्रुपचे लोक या बाबतीत सर्वात भाग्यवान म्हणावे लागतील.  या रक्तगटाच्या लोकांना फारसे टाळावे लागत नाही. तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे, मासे, मटण आणि चिकन सर्वकाही खाऊ शकता. मात्र जो काही आहार घेताल तो संतुलित असावा असाही सल्ला तज्ज्ञ देतात. 


वाढत्या वयानुसार काही लोकांना उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब किंवा मधुमेह असे आजार होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व रक्तगटाच्या लोकांनी आहाराबाबत एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.