DiabetesMeinImmunityZaroori : डायबेटीस किंवा मधुमेह हा एक गुंतागुंतीचा विकार आहे. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या आणि मूत्रपिंडाशी संबंधित विविध आरोग्य समस्यांशी सामना करावा लागतो. याशिवाय, डायबेटीसचा शरीराच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायबेटीस असल्यास बॅक्टेरिया आणि विषाणूंविरोधात रोगप्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात बिघडतो. त्यामुळे संसर्ग आणि विविध आजार होऊ शकतात. डायबेटीस असलेल्या व्यक्तींना सहज संसर्ग होतो. शिवाय, तो संसर्ग बरा होण्यास वेळही जास्त लागतो.


मजबूत प्रतिकारशक्ती डायबेटीसच्या रुग्णांमध्ये संसर्गावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते आणि संसर्गाशी संबधित कोणत्याही समस्येचा धोका कमी करते. त्यामुळे तुम्ही डायबेटीसचे रुग्ण असाल, तर तुमच्या प्रतिकारशक्तीकडे थोडं अधिक लक्ष देणं उपयुक्त ठरू शकतं. तुमचा आहार, दैनंदिन अ‍ॅक्टिव्हिटीज आणि झोपेच्या वेळापत्रकाबद्दल अधिक काळजी घेतली पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं अन्न खाल्लं पाहिजे, जेणेकरून आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल.


रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असलेले योग्य घटक माहीत असतील, तर प्रतिकारशक्ती वाढवणं हे फार अवघड काम नाही. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हंगामी भाज्या, फळं, लो फॅट दुग्धजन्य पदार्थ आणि नियमित फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीजसह डाबर च्यवनप्रकाश शुगरफ्रीसारखे हेल्थ सप्लिमेंट्सदेखील घेऊ शकता.


 



 


डाबर च्यवनप्रकाशमध्ये वरून अजिबात साखर घातली जात नाही. डाबर च्यवनप्रकाशमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो. डायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी ते वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित असल्याचं सिद्ध झालं आहे. एक चमचा च्यवनप्रकाशमध्ये (अंदाजे 10 ग्रॅम) अनेक आयुर्वेदिक घटकांचा समावेश असतो. त्यात आवळा, गिलोय, अश्वगंधा आणि आसन यांसारख्या 40 पेक्षा जास्त आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा समावेश आहे. च्यवनप्रकाशमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सदेखील आहेत. त्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानाशी लढण्यास मदत होते. च्यवनप्रकाशमुळे शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि शरीराला संसर्गांशी लढण्यास मदत मिळते.


डाबर च्यवनप्रकाश रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच, डायबेटिक व्यक्तीच्या शरीरातली ऊर्जापातळी सुधारण्यासही मदत करतं. खोकला आणि सर्दी यांसारख्या सामान्य संसर्गांपासून संरक्षण करण्यास मदत होते आणि क्षमता वाढते.


दररोज दोन चमचे डाबर च्यवनप्रकाश खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते आणि दैनंदिन संसर्गापासून संरक्षण मिळतं. कोमट दुधासह च्यवनप्रकाश खाल्ल्यास अधिक उपयोग होतो. त्यातल्या आयुर्वेदिक घटकांमुळे वात, पित्त आणि कफ यांसारख्या त्रिदोषांचा समतोल राखण्यासही मदत होते.


( डिस्क्लेमर : च्यवनप्रकाश हे एक आयुर्वेदिक औषध आहे. डायबेटीसवर उपचार करण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी त्याची निर्मिती केलेली नाही. वापर कसा करावा यासाठी लेबल पाहा. 'नो अ‍ॅडेड शुगर' हा शब्दप्रयोग रिफाइन्ड साखरेच्या संदर्भात केलेला आहे. लेखातला संसर्ग आणि आजारांचा उल्लेख खोकला आणि सर्दीसारख्या सर्वसामान्य आजारांशी संबंधित आहे. या लेखातला कंटेंट केवळ माहितीच्या उद्देशाने दिला आहे आणि त्याचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नये.)


Disclaimer : Above mentioned article is a featured content. This article does not have journalistic/editorial involvement of IDPL, and IDPL claims no responsibility whatsoever.