मुंबई : प्रेम हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्वाचं असतं. माणूस प्रेमासाठी स्वत:ला बदलतो. इतकेच काय तर माणूस प्रेमासाठी आपला इतर गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोनही बदलतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी माणूस वाट्टेल ते प्रयत्न करत असतो. पार्टनरला खुश करण्यासाठी वेगवेगळ्या टीप्स आजमावल्या जातात. कारण कोणत्याही छोट्या गोष्टीमुळे कधी हे प्रेमाचं नातं तुटेल, याची भीती लागलेली सर्वांना सतावत असते. 


एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आजच्या फास्ट जगात लोकांमध्ये लवकर प्रेमात पडण्याची आणि तितक्याच लवकर ब्रेकअप होण्याची प्रकरणे वाढत आहे. याच विषयावर एक रिसर्च करण्यात आलाय. ज्यातून ब्रेकअपचं कारण शोधण्यात आलं आहे. या रिसर्चमधून आश्चर्यकारक निष्कर्ष समोर आले आहेत. 


मिशीगन यूनिव्हर्सिटीच्या ह्युमन सायकॉलॉजी डिपार्टमेंट द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये ‘प्रेम’ हेच ब्रेकअपचं कारण सांगण्यात आलं आहे. अभ्यासकांनुसार, यूरोप आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये ब्रेकअपचं मुख्य कारण एका पार्टनरचं प्रेमाबद्दल जास्तच संवेदनशील असणं हे आहे. पार्टनरबाबत अधिक पझेसिव्ह असणं हे ब्रेकअपचं कारण सांगण्यात आलं आहे. 


जेव्हा जोडीदारांपैकी पार्टनरवर खूप प्रेम करतो, तेव्हा तो समोरच्याकडूनही त्याच प्रेमाची अपेक्षा करत असतो. जर पार्टनर या गोष्टीला समजू शकला नाही तर नातं अडचणीत येतं. दोघांच्या आनंदात मिठाचा खडा पडतो. रिपोर्टनुसार, ही स्थिती दोघांसाठीही खूप वाईट आहे. यात एक पार्टनर हा विचार करतो की, त्याच्या प्रेमात काहीच कमतरता नाहीये आणि दुसरा पार्टनर विचार करतो की, त्याचं स्वातंत्र्य हिसकावलं जातंय. अशा परिस्थीतीत दोघेही त्यांच्यासाठी नव्या वाटेचा शोध घ्यायला लागतात.