Knowledge News: लग्नाआधी नवरीच्या हाती का लावतात मेहंदी ?
सध्या लग्नसराईचा माहोल सुरु आहे
मुंबई : सध्या लग्नसराईचा माहोल सुरु आहे. अनेक घरांमध्ये लगीनघाई पाहताना नकळतच आपल्यालाही आनंद होत आहे. लग्न म्हटलं की परंपरा आणि प्रथा पूर्ण करण्यासाठी घाट घालणं आलंच. यातलाच एक भाग म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम.
लग्नामध्ये साजशृंगार करण्याची, नटण्याची प्रत्येक नवरीची इच्छा असते. मेहंदी याचाच एक भाग.
हातांवर सुंदर नक्षीकाम असणारी ही मेहंदी सर्वांचं लक्ष वेधते पण, तुम्हाला यामागे दडलेलं वैज्ञानिक कारण माहितीये?
हात आणि पायांवर का लावली जाते मेहंदी?
लग्नाच्या वेळी नवरा मुलगा आणि नवरीच्या मनावर बरंच दडपण असतं. यासाठीच जेव्हा हातांवर आणि पायांवर मेहंदी काढली जाते तेव्हा ही मेहंदी नैसर्गिकरित्या थंडपणा देते.
शरीराचं तापमान यामुळं कमी होतं आणि सहाजिकच मनातील भीतीही कमी होतं.
नव्या जोडीसाठी असतं नशिबाचं प्रतीक
मेहंदीकडे प्रेमाची निशाणी म्हणूनही पाहिलं जातं. असं म्हटलं जातं की मेहंदी जितकी जास्त रंगेल तितकं लग्नासाठी सज्ज असणाऱ्या जोडीचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं. नव्या नात्याचे बंध ही मेहंदी व्यक्त करत असते.
फक्त हिंदूच नव्हे, तर इतरही धर्मांमध्ये मेहंदीचं महत्त्वं जास्त आहे, असा तुमचा समज असेल तर हेसुद्धा वाचा. कारण सर्व धर्मांमध्ये मेहंदीचा वापर केला जातो. हातांवर नक्षीदार डिझाईनच नव्हे तर केस रंगवण्यासाठीही ही मेहंदी तितकीच फायद्याची ठरते.