मुंबई : देशात ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत चाली आहेत. ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मास्क कसा असावा याबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, त्यात लोकांना N-95 मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध असल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम झाला आहे. त्यात एन-95 मास्क नकली देखील असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे खरा आणि खोटा एन-95 मास्क कसा ओळखायचा याबद्दल देखील लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएस हेल्थ एजन्सी सीडीसीने आधीच बाजारात नकली एन-95 मास्क संदर्भात अलर्ट जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी खरा आणि बनावट मास्कमध्ये फरक कसा समजायचा याबद्दल सांगितले आहे.


CNN नुसार, N-95 मास्क नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ (NIOSH) द्वारे प्रमाणित करणे आवश्यक आहे. NIOSH मुखवटे फक्त तेव्हाच प्रमाणित करते जेव्हा ते हवेतील कणांपैकी 95% पर्यंत फिल्टर करण्यास सक्षम असतात. हा गुण कोरोनापासून बचाव करण्यासाठी काम करतो.


अहवालानुसार, जर N-95 मास्कवर NIOSH च्या प्रमाणपत्राचा शिक्का नसेल तर तो बनावट आहे. बनावट मास्क बनवणारे NIOSH स्पेलिंग देखील बदलू शकतात जेणेकरून लोक ते पाहून फसले जातील. म्हणून, जेव्हाही तुम्ही मास्क खरेदी करता तेव्हा पूर्ण नाव वाचा आणि स्पेलिंगमध्ये कोणतीही फेरफार केलेली नाही ना ते तपासा.


N-95 मास्कमध्ये अनेक माहिती दिली आहे, जी ती खरी असल्याचे दर्शवते. उदाहरणार्थ, N-95 मास्कमध्ये, NIOSH नाव, ब्रँड नाव, मान्यता क्रमांक, मॉडेल क्रमांक, लॉट क्रमांक आणि फिल्टर क्रमांक दिलेला आहे. तपासानंतरच हा मास्क बाजारात आणला गेला आहे. अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसीने जारी केलेल्या या फोटोवरुन तुम्ही हे समजू शकता. त्यामुळे मास्कवर अनेक गोष्टी असाव्यात.


एवढेच नाही तर मास्कवर दिसणारा ब्रँडही तपासा. CDC इंडेक्समध्ये ज्या ब्रँडने N-95 मास्क बनवला आहे, त्याचे नाव तपासा. त्या ब्रँडचे नाव पाहण्यासाठी CDC च्या अधिकृत वेबसाइटवर जा. जर त्या ब्रँडचे नाव CDC लिस्टमध्ये नसेल, तर त्याचा अर्थ असा होतो की ते बनावट आहे.