सावधान! झोपेच्या अभावामुळे राग येतोय, मग जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स
निरोगी राहण्यासाठी दररोज 8 ते 9 तास झोप घेणं गरजेचं मानलं जातं.
मुंबई : निरोगी राहण्यासाठी दररोज 8 ते 9 तास झोप घेणं गरजेचं मानलं जातं. परंतु एखाद्याला निद्रानाश किंवा तणाव इत्यादींमुळे झोपेचा अभावाला सामोरं जावं लागतं. झोपेच्या अभावामुळे तुमच्या मूडवर परिणाम होताना दिसतो. ज्यामुळे तुम्हाला चिडचिडे बनू शकता तसंच तुम्हाला सतत राग येऊ शकतो.
झोपेच्या अभावामुळे चिडचिड होणं आणि राग येणं हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी तसंच इतरांसाठी हानिकारक ठरू शकतं. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामावरही होऊ शकतो. झोपेच्या अभावामुळे राग आणि चिडचिडेपणावर मात करण्याच्या टिप्स जाणून घेऊया.
झोपेच्या अभावामुळे जर तुम्हाला राग येत असेल तर तो घालवण्यासाठी आधी झोप घ्यावी. प्रयत्न करा की, तुम्ही थोडा वेळ झोपू शकाल. जेणेकरून तुमचा मूड चांगला होईल.
जर तुम्हाला तणावामुळे झोप लागत नसेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर काही पद्धतींचा अवलंब करावा. जसं ध्यान करणं किंवा झोपेच्या सवयी सुधारणं. जेणेकरून तुम्हाला दररोज 8 ते 9 तासांची झोप मिळेल.
झोपेच्या अभावामुळे येणारा राग कमी करण्यासाठी त्वरित दीर्घ श्वास घ्या. यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि तुम्हाला बरं वाटेल.
अशावेळी तुम्ही मूड हलका करू शकता. ज्याद्वारे तुमचा मूड बदलेल आणि तुमचा राग कमी होऊ शकेल.