मुंबई : धावपळीच्या जीवनशैलीमुळे जेवनाची वेळ अनेकांना पाळता येत नाही. ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतोय. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी जेवणाची वेळ निश्चित केली पाहिजे. पण त्याहून घातक गोष्ट म्हणजे रात्री उशिरा जेवणे. कारण यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका वाढू शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की, जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहासाठी जबाबदार ठरतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांना असे आढळून आले की रात्री उशिरा जेवल्याने कॅलरीजचे प्रमाण, चयापचय आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो, ज्यामुळे वजन वाढू शकते. रात्री उशिरा जेवल्याने ऊर्जेचा खर्च कमी होतो, भूक वाढते आणि ऍडिपोज टिश्यूमध्ये बदल होतो. या परिस्थिती एकत्रितपणे लठ्ठपणाचा धोका वाढवतात.


जे लोक उशिरा जेवतात त्यांच्यामध्ये भूक-नियमन करणार्‍या हार्मोन्स जसे की लेप्टिन आणि घरेलिनवर परिणाम होतो. संप्रेरक लेप्टिन, जे परिपूर्णतेचे संकेत देते, विशेषतः उशीरा खाणाऱ्यांमध्ये कमी आढळले. अशा लोकांमध्ये, कॅलरी बर्निंगचा वेग देखील इतर गटाच्या तुलनेत कमी दिसला, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका देखील दिसून आला.


जे लोक उशिरा जेवतात त्यांच्या शारीरिक आणि आण्विक यंत्रणेवर परिणाम होतो ज्यामुळे कालांतराने लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. जागतिक स्तरावर ही समस्या वाढताना दिसत आहे.


संशोधकांच्या टीमने लठ्ठपणाची स्थिती विविध प्रकारच्या गंभीर आरोग्य समस्यांमधली एक घटक म्हणून ओळखली, ज्यापैकी काही जागतिक स्तरावर मृत्यूदर वाढवणारे एक प्रमुख घटक म्हणूनही पाहिले गेले आहेत. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या तज्ञांनी अहवाल दिला की लठ्ठपणा थेट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक वाढवते, ज्यात डिस्लिपिडेमिया, टाइप -2 मधुमेह, उच्च रक्तदाब आणि झोप विकार यांचा समावेश आहे.


लठ्ठपणा हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी देखील कारणीभूत ठरु शकतो. म्हणून सर्व वयोगटातील लोकांनी त्यांच्या स्तरावर लठ्ठपणा टाळण्यासाठी उपाय केले पाहिजे. रात्री लवकर जेवण्याची आणि जेवणानंतर चालण्याची सवय लावून त्याचा धोका कमी केला जाऊ शकतो.