शिळ्या चपात्या फेकून देऊ नका, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
Leftover Roti Benefits : शिळ्या चपात्या खाणं अनेकांना आवडत नाही, पण तुम्हाला माहितीयेत का शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे... एकदा तुम्हाला शिळ्या चपात्या खाण्याचे फायदे कळले तर तुम्ही फक्त खाल शिळ्या चपात्या
Leftover Roti Benefits : आपल्या सगळ्यांना तव्यावरून काढलेली गरम गरम चपाती खायला खूप आवडते. ती थंड झाल्यावर अनेक लोक खात नाहीत. चपाती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. पण तुम्हाला माहितीये का? शिळी चपाती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. फक्त शिळी चपाती नाही तर शिळी भाकरी देखील आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगली आहे. तज्ञ असं म्हणतात की जर शिळ्या चपात्या तुम्ही योग्य प्रकारे खाल्या तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. शिळ्या चपात्या खाल्यानं मधुमेह आणि पचनासाठी सगळ्यात चांगल्या असतात. ज्या लोकांना या दोन समस्या आहेत त्यांनी शिळ्या चपात्या खाण्यावर भर देणं गरजेचं आहे. आता शिळ्या चपात्यांचे सेवण देखील कसे करावे आणि त्याचे फायदे आज आपण सगळं जाणून घेऊया.
शिळ्या चपात्या या नेहमी बनवल्याच्या 12-15 तासात खायला हव्या. त्या काळात खाल्यानं त्यांचा खूप जास्त फायदा होतो. अनेक तज्ञ सकाळच्या नाश्त्यात शिळ्या चपात्या खाण्याचा सल्ला देतात. सकाळी सकाळी तुम्ही ही शिळी चपाती जर दुधासोबत खाल्ली तर त्याचा नक्कीच फायदा होईल. चपात्या कशा प्रकारे ठेवायला हव्या. शिळ्या चपात्या तुम्हालाही खायच्या असतील तर बनवल्यानंतर त्या फ्रीजमध्ये एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा. तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या चपात्या तुम्ही 1-2 दिवस खाऊ शकता.
कॅलरीजचे कमी प्रमाण
ज्या लोकांना वजन कमी करायचे असेल त्या लोकांनी शिळ्या चपात्यांचे सेवण करा. कारण त्यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. चपातीतील स्टार्च हे जशी वेळ जाते तसे कमी होते. त्यामुळे कॅलरीज कमी होतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
पचायला सोपी
गरम गरम किंवा ताज्या चपात्या या पचायला सोप्या नसतात. कारण त्यात स्टार्चचे प्रमाण खूप जास्त असते. त्या तुलनेत शिळ्या चपातीत स्टार्चचे प्रमाण हे कमी असते त्यामुळे पचन प्रक्रिया सोपी होते. ज्या लोकांना अपचनाती समस्या आहे त्यांनी शिळ्या चपात्यांचे सेवन करावे.
फायबरचे मोठे प्रमाण
शिळ्या चपात्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. फायबर जर पुरेसे मिळाले तर पाचन प्रक्रिया सुरळीत राहते. शिळ्या चपातीत फ्रेश चपाती पेक्षा जास्त फायबर असतात. जर पाचन प्रक्रिया सुरळीत रहायला हवी तर नक्कीच शिळ्या चपात्या खा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)