मुंबई : वेगवेगळ्या व्यायाम करून, खाणं बंद करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर ही बाब गंभीर आहे. याकडे तुम्हाला अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सायंकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला वजन कमी करण्याच मदत करतील. जाणून घेऊया त्या खास गोष्टी....


रात्री करा वर्कआऊट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जास्तीत जास्त लोकांचं म्हणनं आहे की, झोपण्याआधी वर्कआउट केल्यास त्यांची झोप खराब होईल. पण हे खरं नाहीये. २०१३ मधे नॅशनल स्लीप फाऊंडेशनकडून करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून खुलासा झालाय की, ५६ ते ६७ टक्के लोक झोपण्यापूर्वी व्यायाम करतात आणि त्यामुळे त्यांना झोपही चांगली येते. रात्री व्यायाम केल्याने दिवसभर काम करून आलेला ताणही कमी होतो. पण जेवण आणि व्यायामामध्ये साधारण दोन तासांचं अंतर असावं. 


रात्री करा लंचची तयारी


सकाळी ऑफिसला जाण्याच्या धावपळीत तुम्ही नेहमीच आपलं लंच पॅक करणं विसरता आणि मग ऑफिसच्या कॅन्टीनमधून काहीतरी घेऊन खाता. त्यामुळेच तुम्ही इच्छा असूनही वजन करू शकत नाही आहात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, घरी बनवण्यात आलेल्या पदार्थांपेक्षा बाहेरच्या पदार्थांमध्ये दुप्पट कॅलरीज असतात. अशात जर तुम्हाला सकाळी लंच बनवण्यासाठी वेळ मिळत नसेल तर रात्रीच तयारी करून ठेवा.


खोतील अंधार करून झोपा


जर्नल ऑफ पीनियम रिसर्चमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेलाटोनिन हार्मोन आपल्या शरिरात ब्राऊन फॅट बनवतात ज्याने कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते. अंधारात आपलं शरीर जास्त मेलाटोनिन उत्पन्न करतात. अशात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर झोपताना खोलीत पूर्णपणे अंधार करा. 


झोपण्यापूर्वी पाणी पिऊ नये


अनेक लोकांना हे माहिती असणार की, आपल्या शरीराला डीटॉक्स करून शरीरातून हानिकारक तत्वांना यूरीन आणि घामाच्या माध्यमातून बाहेर काढण्यास मदत करतं. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की, रात्री झोपल्यावर पुन्हा पुन्हा तुम्हाला टॉयलेटला जावे लागू नये तर झोपण्यापूर्वी १ तास आधी पाणी प्या. 


थोडी लाल मिरची पावडर खा!


अनेक अभ्यासातून या गोष्टीचा खुलासा केला की, फॅट कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय लाल मिरची पावडर खावे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं शरीर फॅट बर्न करतं. अशात जर तुम्ही रात्रीच्या जेवणात लाल मिरची पावडर खाल्लं किंवा पनीरवर थोडी लाल मिरची पावडर खाल्लं तर वजन कमी करण्यास मदत मिळेल.