Fitness Tips : आपल्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराच्या योग्य विकासासाठी पौष्टिक आहार घेणं खूपच आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे देत नसाल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार आणि विकार होऊ शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरीराच्या विकासासाठी अ जीवनसत्व आवश्यक


आपल्या शरीराच्या वाढीसाठी अ जीवनसत्व आवश्यक असते. व्हिटॅमिन-ए डोळे, त्वचा आणि दातांसाठी फायदेशीर मानले जाते. गाजर, संत्री आणि रताळे यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळते.


व्हिटॅमिन बीचा आहारात करा समावेश


शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमिन-बी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही याचा आहारात समावेश केलात तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुमची एनर्जी वाढवण्यापासून ते शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यापर्यंत व्हिटॅमिन-बी महत्त्वाची भूमिका बजावते. केळी, मसूर, मिरची, बीन्स आणि यीस्टमध्ये व्हिटॅमिन बी आढळते.


व्हिटॅमिन सी देखील महत्त्वाचे


व्हिटॅमिन-सी देखील आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन-सी शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढते. सोबतच रक्तवाहिन्या मजबूत होतात. व्हिटॅमिन-सी सामान्यतः पेरू, लाल आणि हिरवी मिरची, किवी, संत्रा, द्राक्षे, स्ट्रॉबेरी इत्यादींमध्ये आढळते.