Lizard benefits: पालीची (Lizard) भीती वाटतं नाही, असं म्हणारा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. घरात कुठे पाल असेल तर आपण त्या दिशेला जाण्यास घाबरतो. पालीला पाहून अनेकांना किळसवाण वाटतं. घरातून पाल पळवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. मार्केटमध्ये पाल पळवून लावण्यासाठी औषधं (Medicines) देखील उपलब्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला माहिती आहे, पाल घरात असणे आवश्यक आहे आणि त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे (Amazing benefits) आहेत. होय, अगदी बरोबर पाल घरात असणे फायदायचे आहे. विशेष म्हणजे पाल घरात असण्याचा थेट तुमच्या आरोग्याशी (health) संबंध आहे. 


आता तुम्ही म्हणाल की पाल आणि आरोग्याचा काय संबंध...तर चला जाणून घेऊयात घरात पाल असण्याचे फायदे...पाली व्यतिरीक्त आपल्या घरात आपण वेगवेगळे कीटक (insect) नेहमी पाहत असतो. विशेष करुन पावसाळ्यात कीटकांचं प्रमाण अधिक वाढतं. जर तुमच्या घरात पाल असेल तर या कीटकांचा ती फडशा पाडते. 


घरात येणारे डास (mosquito), माश्या (House flies)पाल खातात. त्यामुळे डास आणि माश्यामुळे पसरणारा रोग नियंत्रणात राहतात. निसर्गाने प्रत्येक प्राण्याची निमित्ती ही कुठल्या ना कुठल्या कामासाठी केली आहे. पृथ्वीवर (earth) कीटकांची खूप मोठी संख्या आहे. 


पालीच्या लाळेमुळे माणसाचा मृत्यू होता? 


अनेक वर्षांपासून गावोगावी एक दंतकथा सांगितली जाते की, पालीच्या लाळेमुळे माणसाचा मृत्यू होतो. माणसाचा मृत्यू (death) होईल, एवढ्या पाली विषारी नसतात, असं तज्ज्ञ सांगतात. पण पालीची लाळ जेवणात पडल्यामुळे आपल्या आरोग्यास नुकसान होऊ शकतं. मात्र कुठलेही गंभीर आजार होत नाही आणि त्यावर उपचारही आहेत. 


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)