मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक डाएट आणि व्यायाम करतात. परंतु, बर्‍याच वेळा काहीही न करता वजन कमी होण्यास सुरवात होते. अशा परिस्थितीत लोक आनंदी होऊ लागतात की काहीही न करता वजन कमी होतंय. परंतु अचानक वजन कमी होणं हे शारीरिक समस्येचं लक्षण असू शकतं. असं होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक आणि काहीही न करता वजन कमी होणं किती हानिकारक आहे. कोणतंही डाएट किंवा जीमला न जाता जर तुमचं वजन कमी होत असेल तर हे विशिष्ठ आरोग्याच्या समस्येचे संकेत असू शकतात.


यूकेची आरोग्यविषयक माहिती देणारी वेबसाइट NHS मते, बर्‍याच सामान्य कारणांमुळे आपल्या शरीराचं वजन वर्षभर कमी जास्त होत असतं. परंतु, जर 6 ते 12 महिन्यांच्या आत आपण कोणत्याही कारणास्तव तुमच्या शरीराचं वजन सुमारे 5 टक्क्यांनी कमी झालं असेल तर ते चिंताजनक असू शकतं.  यामुळे थकवा, भूक न लागणं, आजारी पडणं यासारखी चिन्हं देखील दिसू शकतात.


वजन अचानक कमी होण्यामागील कारणं


  • काही विशिष्ठ औषधांचं सेवन

  • डिप्रेशन

  • हृदय, किडनी, फुफ्फुस आणि लिव्हरसंबंधीत समस्या

  • रयूमेटाइड आर्थराइटीस सारखी समस्या

  • दारू आणि ड्रग्जची सवय

  • माऊथ अल्सर किंवा तोंडाच्या समस्या

  • डिमेंशिया

  • पोटाचा अल्सर

  • पोटाच्या इतर समस्या