प्रेमभावनेमुळे होणार आरोग्यास फायदा...
लहानपणापासून घरातून, शाळेतून आपल्यावर नेहमी दुसऱ्यांशी चांगले वागावे, असे शिकवले जाते.
मेलबर्न : लहानपणापासून घरातून, शाळेतून आपल्यावर नेहमी दुसऱ्यांशी चांगले वागावे, असे शिकवले जाते. इतरांनी भावबंध ठेवावा, प्रेमपुर्वक वातावरण ठेवण्याची शिकवणूक दिली जाते. आपले हे संस्कार किती उत्तम आहेत, याचा प्रयत्य येणारी एक संशोधन समोर आले आहे.
नवा शोध
प्रेमपुर्वक वर्तवणुकीमुळे माणूस आजारांपासून दूर राहतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, प्रेमपुर्वक वर्तवणुकीमुळे लव्ह हार्मोन्स वाढतात व त्यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते. संशोधकांनी लव्ह हार्मोन्स ऑक्सीटोसिनचे सिंथेटिक संस्करण विकसित केले आहे. ज्यामध्ये साईट इफेक्ट होण्याची संभावना कमी आहे. या हार्मोनमुळे प्रेमभावना वाढीस लागते व तुम्ही आपुलकीने वागू लागता.
त्याचबरोबर यामुळेच तुम्ही तणाव आणि चिंता व्यक्त करू शकता. ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलैंड विश्वविद्यालयाच्या मार्कस मटनथालर (Markus Muttenthaler)यांनी सांगितले की, शरीरात ऑक्सीटोसिनच्या कमीमुळे साईड इफेक्ट होतात. ऑक्सीटोसिन आपल्या शरीरात मेहनत करण्याची क्षमता वाढवतो. मात्र याचे साई़ड इफेक्ट होतात. त्याचबरोबर गर्भाशयातील बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरते.
सकारात्मक परिणाम
सायन्स सिग्नलिंग (Science Signaling)या पत्रिकेत संशोधकांनी सांगितले की, मायग्रेन, चिंता, तणाव यांनी ग्रासलेल्या लोकांमध्ये ऑक्सीटोसिनचे संशोधन सुरू आहे. उंदरांवर केलेल्या प्रयोगातून सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ऑक्सीटोसिनच्या मदतीने गंभीर समस्यांवर इलाज होऊ शकतो. याचा वापर औषधात करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.